मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Shocking! भरमंडपात केस खेचून फरफटत नेलं, लाथाबुक्क्यांनी तुडवलं; लग्नात नवरदेवाने घेतला नवरीचा जीव

Shocking! भरमंडपात केस खेचून फरफटत नेलं, लाथाबुक्क्यांनी तुडवलं; लग्नात नवरदेवाने घेतला नवरीचा जीव

लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने नवरीला बेदम मारहाण करत तिची हत्या केली आहे.

लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने नवरीला बेदम मारहाण करत तिची हत्या केली आहे.

लग्नाच्या दिवशीच नवरदेवाने नवरीला बेदम मारहाण करत तिची हत्या केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Viralimalai

मॉस्को, 06 ऑगस्ट : लग्नमंडप सजला होता, नातेवाईक-पाहुणे लग्नासाठी आले होते. आनंदाचं वातावरण होतं. पण हे वातावरण काही क्षणच टिकलं. लग्नाच्या दिवशी भरमंडपात नवरदेवाने नवरीची  हत्या केली. नवरदेवाने पाहुण्यांसमोरच नवरीला इतकं बेदम मारलं की मारहाणीत नवरीचा जीव गेला. जिला आयुष्याचा जोडीदार बनवायला निघाला, जिच्यासोबत सात जन्माच्या गाठी बांधणार होता, तिलाच त्याने संपवलं.  रशियातील ही थरकाप उडवणारी घटना. नवरदेवाच्या या भयंकर कृत्यामागील कारणही धक्कादायक आहे.

25 वर्षांचा स्टिफन डोलगिखने आणि 36 वर्षांची ओक्साना पोलुडेंटसेवा दोघंही लग्नबंधनात अडकणार होते. पण लग्नाचा हा दिवस आपल्या आयुष्याच शेवटचा दिवस असेल याचा ओक्सानाने स्वप्नातही विचार केला नव्हता. तिच्या होणाऱ्या नवऱ्यानेच तिचं आयुष्य संपवलं. लग्नाच्या दिवशीच पाहुण्यांसमोर त्याने तिला मारून मारून तिचा जीव घेतला.

हे वाचा - धक्कादायक! नवरा म्हणाला, 'I LOVE YOU'; त्याच्या डोळ्यादेखतच बायकोने सोडला जीव; नेमकं काय घडलं पाहा

आज तकने द मिररच्या रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार स्टिफनच्या गावातील घरात लग्नसोहळा आयोजित करण्यात आला होता. स्टिफन तिथं ओक्सानाला लाथाबुक्क्यांनी मारत राहिला. तिचे केस धरून तिला जमिनीवर घसटलं. तिच्या डोक्यावर वार केले. या मारहाणीत तिचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने तिचा मृतदेह एका खड्ड्यात फेकला.

नवरदेवाचं रूप पाहून लग्नात आलेले पाहुणेही घाबरले. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. त्याला अटक करण्यात आली. तो दारूच्या नशेत होता. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हा आरोपी याधीही हत्येच्या आरोपात तुरुंगात गेला होता. जेव्हा तो तुरुंगात होता तेव्हा या दोघांची मैत्री झाली होती. आपण स्टिफनला सुधारू असं ओक्सानाला वाटलं त्यामुळे तुरुंगातून बाहेर येताच त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

हे वाचा - '…म्हणून लग्नापूर्वीच पळून गेली नवरी', सोशल मीडियावर सांगितलं कारण

पण आपली होणारी बायको आपली फसवणूक करत आहे, असा संशय स्टिफनला होता. या संशयातून रागात त्याने हे कांड केलं. स्टिफनने या हत्येची कबुली दिली. ओक्साना लग्नात आलेल्या पाहुण्यांच्या जास्त जवळ जात होती, त्यामुळे त्याला राग आला होता, असं त्याने सांगितलं. हे प्रकरण ऑक्टोबर 2021 मधील आहे. नुकतीच स्टिफनला शिक्षा सुनावण्यात आली आहे.

First published:
top videos

    Tags: Bridegroom, Crime, Death, Murder, Viral, World news