नाशिक, 21 सप्टेंबर: नाशकातील एका तरुणाने सातऱ्यातील तीन पहिलवानांच्या मदतीने केरळातील एका बँकेवर दरोडा (Robbery at bank in kerala) टाकल्याची घटना उघडकीस आली होती. आरोपींनी केरळातील बँकेतून तब्बल साडेतीन कोटींचं सोनं लुटलं (Robbed 3.5 crore worth gold) होतं. केरळ पोलीस तपास करत असताना, या दरोड्याचे धागेदोरे नाशिक आणि साताऱ्यापर्यंत येऊन पोहोचले होते. याप्रकरणी केरळ आणि सातारा पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत चार आरोपींच्या मुसक्या (4 Arrested) आवळण्यात आल्या आहेत.
तर नाशकातील निक ऊर्फ निखिल जोशी हा या दरोड्याच्या घटनेतील मुख्य सूत्रधार असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. अलीकडेच सातारा पोलिसांनी मुख्य आरोपी जोशीसह तीन पहिलवानांना अटक केली होती. मुख्य आरोपी जोशी हा मुळचा नाशिक येथील रहिवासी असून त्याने साताऱ्यातील तीन पहिलवानांच्या मदतीने हा दरोडा टाकल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.
हेही वाचा-29 वर्षाआधी तुरुंगातून झाला फरार; आता स्वतःच पोलिसांकडे जात केली अटकेची मागणी
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी केरळातील एका बँकेवर काही अज्ञातांनी दरोडा टाकला होता. चोरट्यांनी अत्यंत नियोजनपूर्व पद्धतीनं दरोडा टाकत बँकेतील साडेतीन कोटी रुपयाचं सोनं लुटलं होतं. या प्रकरणी केरळात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना, याचे धागेदोरे महाराष्ट्रातील नाशिक आणि सातारा इथपर्यंत पोहोचले आहेत.
हेही वाचा-मूल होण्यासाठी विवाहितेसोबत अघोरी प्रयोग;कोंबडीचं रक्त पाजून सासऱ्याकडून विनयभंग
केरळ पोलिसांनी संशियत आरोपींचा माग काढत सातारा पोलिसांच्या मदतीने एका हॉटेलातून चार जणांना अटक केली आहे. निखिल जोशी असं अटक केलेल्या मुख्य आरोपीचं नाव असून तो नाशकातील रहिवासी आहे. तर सचिन शेलार, नवनाथ पाटील, अतुल धनवे असं अटक केलेल्या अन्य दरोडेखोरांची नावं आहेत. संबंधित सर्व आरोपी साताऱ्यातील रहिवासी आहे. संशयित आरोपींना आता केरळ पोलिसांच्या ताब्यात दिलं असून या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.