#BREAKING गेल्या 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंद, पाहा चिंता वाढवणारी आकडेवारी

#BREAKING गेल्या 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक रुग्णांची नोंद, पाहा चिंता वाढवणारी आकडेवारी

भारतात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या 67 हजार 152 आहे. तर, आतापर्यंत 20 हजार 916 रुग्ण बरे झाले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 मे : भारतात कोरोनाचा दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबधितांचा आकडा हा 67 हजार 152 झाला आहे. गेल्या 24 तासात भारतात तब्बल 4213 नवीन रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत 24 तासातील हा सर्वाधिक रुग्णांचा आकडा आहे. तर 24 तासात जवळपास 97 लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाला रोखण्यासाठी भारतात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती, मात्र या काळातही रुग्णांची संख्या काही कमी होताना दिसत नाही आहे.

यापूर्वी भारतात यापूर्वी 24 तासात 3900 रुग्ण आढळले होते. त्यामुळे गेल्या 24 तासातील हा रेकॉर्ड ब्रेक आकडा आहे. दिलासादायक बातमी म्हणजे भारतातील निरोगी रुग्णांची संख्या ही मृत्यु दरापेक्षा जास्त आहे. देशातील मृत्युदर सध्या 4% आहे. तर, निरोगी होण्याची आकडेवारी ही 31% आहे. असे असेल तरी वाढता रुग्णांचा आकडा भारतासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो.

भारतात आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या 67 हजार 152 आहे. तर, आतापर्यंत 20 हजार 916 रुग्ण बरे झाले आहे. देशातील एकूण मृतांची संख्या 2,206 आहे.

30 दिवसात कोरोनाबाधितांची संख्या 5.5 लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता

सिंगापूरच्या ड्यूक एनयूएस मेडिकल स्कूलच्या सहकार्याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीनं (IIT) गुवाहाटी यांनी विविध राज्यांमध्ये येत्या 30 दिवसांत कोरोना संसर्गाच्या घटनांचा अंदाज लावण्यासाठी एक नवीन मॉडेल विकसित केले आहे. यानुसार भारतात येत्या 30 दिवसांत 5.5 लाख प्रकरणे समोर येतील. संशोधकांच्या पथकाने सांगितले की सध्या लॉजिस्टिक पद्धतीने 30 दिवसांत 1.5 लाख आणि घातांकीय (एक्सपोनेंशिअल) पद्धतीने 5.5 लाख प्रकरणे आढळतील अशी शक्यता वर्तवली आहे.

मातृदिनीच हरपलं मातृछत्र, एकुलत्या एक मुलीला घेता आलं नाही अंत्यदर्शन

धक्कादायक! मुंबईत सेलिब्रिटींची चिंता वाढली, केअरटेकरच निघाला कोरोना पॉझिटिव्ह

First published: May 11, 2020, 9:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading