जाहिरात
मराठी बातम्या / देश / हायड्रोलिक मशीनवर चढून तिरंगा लावताना मोठा अपघात; स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला तिघांचा मृत्यू, VIDEO

हायड्रोलिक मशीनवर चढून तिरंगा लावताना मोठा अपघात; स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला तिघांचा मृत्यू, VIDEO

हायड्रोलिक मशीनवर चढून तिरंगा लावताना मोठा अपघात; स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला तिघांचा मृत्यू, VIDEO

या घटनेनंतर सर्वत्र गोंधळ उडाला. जखमींना तातडीने खाली आणण्यात आलं. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. तर एकाला गंभीर दुखापत झाली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

भोपाळ 14 ऑगस्ट : ग्वालियरमध्ये महाराजा बाडा येथील महानगरपालिका कार्यालयात तिरंगा लावताना मोठा अपघात झाला. ज्या हायड्रोलिक मशीनवर महामंडळाचे कर्मचारी तिरंगा चढत होते ते अचानक तुटलं. या घटनेनंतर सर्वत्र गोंधळ उडाला. जखमींना तातडीने खाली आणण्यात आलं. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. तर एकाला गंभीर दुखापत झाली आहे. प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांसह प्रभारी महानगरपालिका आयुक्त मुकुल गुप्ताही घटनास्थळी पोहोचले. दुसरीकडे, या घटनेनंतर संतप्त व्यक्तीने प्रभारी पालिका आयुक्तांना चापट मारली. गोंधळ वाढताना दिसल्यानं पोलिसांनी लगेच जमावाला दूर केलं आणि महामंडळाच्या अधिकाऱ्यांना बाहेर काढलं . शहरात पंधरा ऑगस्टची तयारी सुरू आहे. याच कारणामुळे महाराजा बाडा येथील महानगरपालिकेत ध्वाजारोहणाची तयारी सुरू होती. बस प्रवासात 5 महिलांनी अडीच लाखांवर मारला डल्ला; वाहकाच्या सतर्कतेमुळं चोरी उघड शनिवारी सकाळी अग्निशमन दलाचे हायड्रोलिक मशीन मागवण्यात आले. इमारतीवर तिरंगा लावण्यासाठी काही कामगार या हायड्रोलिक मशीनवर चढले. या दरम्यान अचानक हायड्रॉलिक मशीन तुटले. या अपघातात महामंडळाचे कर्मचारी मांजर आलम, कुलदीप दंडैतिया आणि विनोद यांचा मृत्यू झाला आहे. तर एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे.

जाहिरात

उर्मिला मातोंडकरांची होणार चौकशी; कोरोना नियमाचं उल्लंघन केल्याचा आरोप घटनेची माहिती मिळताच पोलीस दल आणि प्रभारी महापालिका आयुक्त मुकुल गुप्ता घटनास्थळी पोहोचले. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्याबरोबरच मृतदेह डेडहाऊसमध्ये नेण्याचे काम सुरू करण्यात आले. दरम्यान, काही लोकांनी घटनास्थळी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या घटनेनंतर कर्मचाऱ्यांमध्ये तसेच सामान्य जनतेमध्येही प्रचंड नाराजी होती. या दरम्यान, मनेज नावाच्या वकिलाने प्रभारी पालिका आयुक्तांना चापट मारली. वकील पुन्हा हल्ला करण्यापूर्वी, पोलीस दलाने त्यांना पकडले आणि दूर नेले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात