मराठी बातम्या /बातम्या /aurangabad /बस प्रवासात 5 महिलांनी बँक मॅनेजरच्या अडीच लाखांवर मारला डल्ला; वाहकाच्या सतर्कतेमुळे अडकल्या जाळ्यात

बस प्रवासात 5 महिलांनी बँक मॅनेजरच्या अडीच लाखांवर मारला डल्ला; वाहकाच्या सतर्कतेमुळे अडकल्या जाळ्यात

याच बसमध्ये बँक मॅनेजरच्या पैशांवर डल्ला मारण्यात आला आहे.

याच बसमध्ये बँक मॅनेजरच्या पैशांवर डल्ला मारण्यात आला आहे.

Crime in Aurangabad: औरंगाबाद याठिकाणी बस प्रवासादरम्यान (Theft During Bus Journey) काही महिलांनी एका बँक मॅनेजरचे अडीच लाख रुपये (Bank Manager Looted By 5 Women) लांबवल्याची घटना समोर आली आहे.

औरंगाबाद, 14 ऑगस्ट: बस किंवा रेल्वे प्रवासात वॉलेट चोरीच्या अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. पण औरंगाबाद (Aurangabad) याठिकाणी बस प्रवासादरम्यान (Theft During Bus Journey) काही महिलांनी एका बँक मॅनेजरचे अडीच लाख रुपये (Bank Manager Looted By 5 Women) लांबवल्याची घटना समोर आली आहे. संबंधित भामट्या महिला बसमधून उतरल्यानंतर, आपले पैसे चोरी झाल्याचं बँक मॅनेजरच्या लक्षात आलं. त्यानंतर वाहकानं दाखवलेल्या सतर्कतेमुळे बँक मॅनेजरला आपले पैसे परत मिळाले आहेत. या प्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR Lodged) करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.

नेमकं काय घडलं?

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 5 लाख रुपयांची रक्कम घेऊन फिर्यादी बँक मॅनेजर बसने प्रवास करत होते. दरम्यान त्यांच्यासोबत बसने प्रवास करणाऱ्या 5 महिलांनी हातचलाखी करत अडीच लाख रुपयांवर डल्ला मारला. आपले पैसे चोरी झाल्याचा बँक मॅनेजरला थांगपत्ताही लागला नाही. रक्कम चोरी केल्यानंतर आरोपी महिला गोळेगाव गावात उतरल्या. भामट्या महिला बसमधून उतरल्यानंतर आपले पैसे चोरी झाल्याचं बँक मॅनेजरच्या प्रकार लक्षात आलं.

हेही वाचा-Shocking! प्रेयसीच्या घरातून थेट पोहोचला रुग्णालयात,उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

मॅनेजरनं त्वरित बस वाहकाला याबाबत माहिती दिली. वाहकानं क्षणाचाही विलंब न करता बस थेट पोलीस ठाण्याच्या दिशेनं नेली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवली आणि शेतीच्या बांधावरून पळून जाणाऱ्या संबंधित पाच महिलांना गाठलं. या महिलांची तपासणी केली असता त्यांच्याकडे अडीच लाख रुपयांची रक्कम आढळून आली आहे. यानंतर पोलिसांनी पाचही  महिलांना ताब्यात घेत त्यांना पोलीस ठाण्यात आणलं आहे.

हेही वाचा-धुळ्याला जाण्यासाठी uber कार बुक केली, चालकाला संपवले पण fastag ने अडकवले!

याप्रकरणी अजिंठा पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बँक मॅनेजरसह बस वाहक आणि चालक यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे चोरीला गेलेले अडीच लाख काही मिनिटांत परत मिळाले आहेत. याबाबत नागरिकांनी पोलिसांचंही कौतुक केलं आहे.

First published:

Tags: Aurangabad, Crime news, Theft