मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /उर्मिला मातोंडकरांची होणार चौकशी; कोरोना नियमाचं उल्लंघन केल्याचा आरोप

उर्मिला मातोंडकरांची होणार चौकशी; कोरोना नियमाचं उल्लंघन केल्याचा आरोप

उर्मिला मातोंडकर एका कार्यक्रमात उपस्थित होत्या, त्यावेळी कार्यक्रमात करोनाच्या निर्बंधांचं उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

उर्मिला मातोंडकर एका कार्यक्रमात उपस्थित होत्या, त्यावेळी कार्यक्रमात करोनाच्या निर्बंधांचं उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

उर्मिला मातोंडकर एका कार्यक्रमात उपस्थित होत्या, त्यावेळी कार्यक्रमात करोनाच्या निर्बंधांचं उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

मुंबई 14 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेत्री तसेच शिवसेनेच्या नेत्या (Shivsena Leader) उर्मिला मातोंडकरांची (Urmila Matondkar) लवकरच चौकशी होणार आहे. उर्मिला मातोंडकर एका कार्यक्रमात उपस्थित होत्या, त्यावेळी कार्यक्रमात करोनाच्या निर्बंधांचं उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. दरम्यान ही घटना झारखंडमध्ये घडली आहे. तेथील एका उद्घाटनाच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. सध्या कोरोनाचा प्रकोप पुन्हा एकदा वाढत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पुन्हा एकदा काटोकोर निर्बंध पाळले जात आहेत. अशातच या कार्यक्रमात नियमांच उल्लंघन केल्याचं समोर येत आहे.

झारखंडमधील (Jharkhand) पलामू जिल्ह्यात एका हॉटेलचं उद्धाटन करण्यासाठी उर्मिला गेल्या होत्या. उर्मिला मातोंडकर यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी नियमांचं पालन करण्यात आलं नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

HBD: 'माता की चौकी'मध्ये गाणारी गायिका ते बॉलिवूडची प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर! असा होता सुनिधीचा प्रवास

झारखंडमधील मेदिनीनगर येथे हा हॉटेलच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमात करोनासंबंधी निर्बंधांचं उल्लंघन झाल्याची तक्रार स्थानिकांनी प्रशासनाकडे केली अशी माहिती उपायुक्त शशी रंजन यांनी दिली आहे. याशिवाय जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा तपास करणार असल्याचंही समजतं आहे.

'चल निघ!' भर रस्त्यात रणबीर कपूरवर भडकली होती प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री; पाहा काय घडलं होतं

दरम्यान यासंबधी चौकशी केली असता हॉटेल प्रशासनाने मात्र आरोप फेटाळले आहेत. व सर्व नियमांचं पालन झालं असल्याचा दावा केला आहे. उर्मिला  मातोंडकर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूण्या म्हणून उपस्थित होत्या. हॉटेल प्रशासनाने  याची माहिती दिली आहे. कोरोनामुळे या कार्यक्रमासाठी दोन तासांऐवजी एक तासच उपस्थित राहणार असल्याचं उर्मिला मातोंडकर यांनी सांगितलं होतं. तसेच उर्मिला मातोंडकर यांनी बंद खोलीतून उपस्थितांशी संवाद साधला. यानंतर त्या रांचीला गेल्या आणि तेथून मुंबईसाठी विमान पकडलं. अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

First published:

Tags: Entertainment, Political leaders, Shiv sena, Urmila Matondar