मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

लाजिरवाणी घटना, ठाण्यात 27 वर्षांच्या जावयाकडून 45 वर्षांच्या सासूवर बलात्कार

लाजिरवाणी घटना, ठाण्यात 27 वर्षांच्या जावयाकडून 45 वर्षांच्या सासूवर बलात्कार

ठाणे जिल्ह्यातून (Thane) लाजिरवाणी अशी घटना समोर आली आहे.

ठाणे जिल्ह्यातून (Thane) लाजिरवाणी अशी घटना समोर आली आहे.

ठाणे जिल्ह्यातून (Thane) लाजिरवाणी अशी घटना समोर आली आहे.

    ठाणे, 05 डिसेंबर: ठाणे जिल्ह्यातून (Thane) लाजिरवाणी अशी घटना समोर आली आहे. जिथे सासू-सुनेचे नाते कलंकित झालं आहे. 27 वर्षांच्या जावयावर आपल्या 45 वर्षांच्या सासूवर बलात्कार (Rape) केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. यादरम्यान आरोपीविरुद्ध हिललाइन पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. FIR ची माहिती मिळताच आरोपी जावई पळून गेला. सध्या पोलिसांचे पथक त्याचा शोध घेत आहे. ही घटना ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमधील आहे. पोलीस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता सासू हिललाइन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते, तर आरोपी जावईही उल्हासनगर येथे राहतो. हेही वाचा- नागालँडमध्ये हंगामा, गोळीबारात 13 जणांचा मृत्यू; SIT करणार चौकशी  पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी जावई लग्नापूर्वी पत्नीच्या आईवर म्हणजेच सासूवर एकतर्फी प्रेम करत होता. लाजेमुळे तो सासूशी लग्न करू शकला नाही. त्यामुळे आरोपीने पीडितेच्या मुलीकडे लग्नाची मागणी केली. अशा परिस्थितीत दोघांनी 2018 साली लग्न केलं. यादरम्यान ही घटना घडली असून सासूनं जावयाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपी फरार पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार हे प्रकरण प्रेमप्रकरणाचे आहे. त्याचबरोबर पीडितेच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 376,506 अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. घटनेपासून आरोपी फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र त्याला लवकरच अटक करण्यात येईल. दरम्यान, आरोपी जावयाला अटक केल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल, असे स्टेशन प्रभारींनी सांगितलं.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Rape, Rape accussed, Thane

    पुढील बातम्या