कानपूर, 18 जून : पब्जी या ऑनलाइन व्हिडीओ गेमनं तरुणांना वेड लावलं आहे. या गेमचा अतिरेक एवढा वाढला आहे, की मुलं दिवसरात्र हा गेम खेळत असतात. यातूनच आता गुन्हेगारी आणि आत्महत्येच्याही बातम्या येत आहे. कानपूरच्या कल्याणपूर येथेही असाच काहीसा प्रकार घडला. पब्जीचा टास्क पूर्ण करता न आल्यानं एका 20 वर्षीय युवकानं गळफास लावून आत्महत्या केली. मुलानं हे धक्कादायक पाऊल फक्त गेमचा टास्क पूर्ण न करता आल्यानं उचललं. मुलाचा मृतहेद पंख्याला लटकलेला पाहून घरच्यांनी लगेचच पोलिसांना फोन केला. पोलिसांनी सध्या मृतजदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. वाचा- ही आहेत DEPRESSION ची प्रमुख 2 लक्षणं; ती दिसली तर व्यक्तीशी कसं बोलायचं? अशोक नगर येथे राहणारे प्रमोद कुमार येथील एका मेडिकल स्टोअरमध्ये काम करतात. त्यांचा भाचा शिवम (20) लहानपणापासून त्यांच्याकडे राहतो. गोंडा ITIमध्ये शिक्षण घेतल्यानंतर तो नोकरी करण्याच्या विचारात होता. मात्र लॉकडाऊनमुळे त्याला नोकरी मिळाली नाही. त्यामुळं तो फावल्या वेळेत मित्रांसोबत पब्जी खेळायचा. वाचा- बहिणीच्या वरातीआधी निघाली भावाची अंत्ययात्रा, संपूर्ण गावाला अश्रू अनावर शिवम पब्जीच्या आहारी गेला होता. दिवसरात्र तो पब्जी खेळत असे. दरम्यान बुधवारी दुपारी शिवम घरी पब्जी खेळत असताना त्याची आजी आणि मावशी बाजारात गेली होती. त्याचवेळी टास्क पूर्ण न होत असल्यानं शिवमनं गळफास लावून घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवम मानसिक तणावात होता. त्याचा मृतेदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. वाचा- सरकारी रुग्णालयात राडा, पोलिसांसमोरच रुग्णांची चाकू भोसकून हत्या
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







