सरकारी रुग्णालयात दोन गटात राडा, पोलिसांसमोरच रुग्णांची चाकू भोसकून हत्या

सरकारी रुग्णालयात दोन गटात राडा, पोलिसांसमोरच रुग्णांची चाकू भोसकून हत्या

रकारी रुग्णालयात पोलिसांच्या उपस्थितीत खून झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

  • Share this:

हरियाणा, 18 जून : हरियाणाच्या फरीदाबाद जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात पोलिसांच्या उपस्थितीत खून झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. ही धक्कादायक घटना बल्लभगढ जवळ घडली. शासकीय रुग्णालयात रात्री उशिरा झालेल्या भांडणानंतर वैद्यकीय उपचारासाठी आलेल्या वृद्ध व्यक्तीची एका तरुणानं चाकू भोसकून हत्या केली. सद्यस्थितीत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि मारेकऱ्याला अटक केली आहे.

बल्लभगढ रुग्णालयातील सेक्टर 2 मधील वृद्ध रहिवासी उमाशंकरची हत्या झाली. उमाशंकर हे येथील एक महाविद्यालयात प्राध्यपक म्हणून काम करत होते, नुकचे ते निवृत्त झाले होते. ते सेक्टर -2 च्या RWAचे विद्यमान प्रमुख होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार RWAच्या माजी प्रमुखांसोबत कोणत्याही तरी गोष्टीवरून वाद झाला होता.

वाचा-बहिणीच्या लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी भावाने केली आत्महत्या, धक्कादायक कारण समोर

रुग्णालयात झाला राडा

बुधवारी रात्री उशिरापर्यंत दोघांमध्ये भांडण झाले आणि उमाशंकर पोलिसात गेले. पोलिसांना याबाबत तक्रार करण्यास सांगितले. पोलीस अधिकाऱ्यानी त्यांना पोलिसांसमवेत बल्लभगड येथील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी पाठवले. त्याच वेळी, एका तरुणानं चाकूने त्याच्यावर हल्ला केला. पोलिसांसमोर झालेल्या या हत्याकांडामुळे रुग्णालयात भीतीदायक वातावरण होते.

वाचा-ओव्हरटेक करू दिले नाही म्हणून पोलिसांची महामार्गावर तरुणांना मारहाण, अखेर...

पोलिसांसमोर हत्या झालीच कशी?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणात तक्रार मिळाल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याच वेळी मारेकऱ्याची चौकशी केली जात आहे. या प्रकरणातील आरोपी पोलीस कोठडीत असल्याची चर्चा आहे, पण सर्वात मोठा प्रश्न फरीदाबादमधील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेचा आहे. पोलिसांसमोर सरकारी रुग्णालयात हत्या झालीच कशी, असा सवाल विचारला जात आहे.

वाचा-21 महिने झाले तरी लेकावर केले नाही अंत्यसंस्कार, घरातच जपून ठेवला सांगाडा

First published: June 18, 2020, 12:04 PM IST

ताज्या बातम्या