देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि एचसीएल (HCL) चे संस्थापक शिव नाडर यांची मुलगी रोशनी नाडर देशातील सर्वात श्रींमत महिला आहे.
शुक्रवारी सकाळी एचसीएलचे टेकचे चेअरमन शिव नाडर यांनी त्यांच्या चेअरमन पदाचा राजीनामा दिला आणि यानंतर लगेचच त्यांची मुलगी रोशनी नाडर यांच्यावर एचसीएल टेकची जबाबदारी आली आहे.
यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या नावाची खूप चर्चा होत आहे. रोशनी नाडर यांची ओळख एवढीच नाही आहे, तर त्या देशातील सर्वात श्रीमंत महिला देखील आहेत.
रोशनी नाडर मल्होत्रा यांनी HCL कॉर्पोरेशनच्या एक्झिक्यूटीव्ह आणि सीईओ म्हणून काम पाहिले आहे. 28 व्या वर्षी त्या कंपनीच्या सीईओ बनल्या होत्या
त्याचप्रमाणे त्या HCL टेक्नॉलॉजी बोर्डाच्या व्हाइस चेअरपर्सन आणि शिव नाडर फाउंडेशनच्या ट्रस्टी देखील होत्या
28 व्या वर्षीच एचसीएलच्या सीईओच्या रुपात सर्व जबाबदारी सांभाळणाऱ्या रोशनी नाडर मल्होत्रा सांगतात की, यामुळे त्यांना वडिलांबरोबर उद्योग जगतात खूप वेळ घालवता आला. त्या असं म्हणतात की त्यांना उद्योगामध्ये समज येऊ लागली असून यामध्ये वडिलांची खूप मदत होत आहे.
दिल्लीमध्ये मोठ्या झालेल्या रोशनी यांनी अमेरिकेच्या Kellog स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून बिझनेस अॅडमिनीस्ट्रेशनची मास्टर्स डिग्री घेतली आहे.
रोशनी नाडर यांचे नाव Forbes द्वारा जारी करण्यात येणाऱ्या जगभरातील 100 सर्वात ताकदवर महिलांच्या यादीमध्ये 2017 ते 2019 दरम्यान सामिल करण्यात आले होते. 2019 मध्ये त्या या यादीमध्ये 54 व्या क्रमांकावर होत्या. 2019 मध्ये त्या देशातील सर्वात श्रीमंत महिला होत्या.