अरे देवा! तिरुपतीत दर्शन सुरु होताच ‘कोरोना’चा प्रवेश, 21 पुजाऱ्यांसह 158 कर्मचारी पॉझिटिव्ह

अरे देवा! तिरुपतीत दर्शन सुरु होताच ‘कोरोना’चा प्रवेश, 21 पुजाऱ्यांसह 158 कर्मचारी पॉझिटिव्ह

पोलिसांनी तयार केलेल्या एका अहवालातही मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात यावं असा सल्लाही देण्यात आला आहे. मंदिरात 100 पुजारी असून त्यातले 21 पुजारी पॉझिटिव्ह आहेत.

  • Share this:

तिरुपती 18 जुलै: जगातल्या श्रीमंत देवस्थांपैकी एक असलेल्या आंध्र प्रदेशातल्या तिरुमला तिरुपती देवस्थानात(Tirupati Temple)  कोरोनाने प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी दर्शनासाठी भाविकांना प्रवेश देण्याची सुरुवात झाली होती. त्यानंतर भाविक येण्यास सुरुवात झाली होती. देवस्थान समितीने (Tirumala Tirupati Devasthanams- TTD)  सर्व काळजी घेतली होती. मात्र त्यानंतरही मंदिरातले 21 पुजारी 158 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय.( Covid-19 Positive) त्यामुळे खळबळ उडाली असून आता पुन्हा मंदिर दर्शनासाठी बंद करायचं का याचा निर्णय घेण्याबाबत विचार सुरू आहे.

पॉझिटिव्ह पुजाऱ्यांमध्ये पेद्दा जियार स्वामी आणि चिन्ना जियार स्वामी या दोन मुख्य पुजाऱ्यांचा समावेश आहे. या घटनेने मंदिर समितीची चिंता वाढली आहे. पुजारी आणि कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आता मंदिर पुन्हा दर्शनासाठी बंद करायचं का याचा विचार करण्यात येत आहे.

जगभरातले लोक दर्शनासाठी मंदिरात येत असतात. मात्र कोरोनामुळे गर्दी बंद झाली आहे. मात्र दर्शन सुरू होताच देणग्यांचा ओघ पुन्हा एकदा सुरू झाला होता. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्यास मंदिरातल्या दररोजच्या पूजा आणि इतर उपचारांवर परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

हे वाचा - प्रसूतीनंतर नर्सने सांगितलं मुलगा झाला, आईच्या हातात दिली मुलगी; होणार DNA टेस्ट

पोलिसांनी तयार केलेल्या एका अहवालातही मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात यावं असा सल्लाही देण्यात आला आहे. मंदिरात 100 पुजारी असून त्यातले 21 पुजारी पॉझिटिव्ह आहेत. तर कर्मचाऱ्यांमध्ये जास्त सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 18, 2020, 6:27 PM IST

ताज्या बातम्या