Home /News /national /

इथं नसणार एकही Traffic Signal; स्मार्ट पद्धतीनं होणार वाहतूक नियंत्रण

इथं नसणार एकही Traffic Signal; स्मार्ट पद्धतीनं होणार वाहतूक नियंत्रण

Traffic Signals

Traffic Signals

ट्रॅफिक सिग्नल म्हणजे अनेक वाहनचालकांना एक कटकट वाटते. हे सिग्नल नसतेच तर, असं कित्येकांना वाटतं.

नोएडा, 11 फेब्रुवारी : रस्ते वाहतूक म्हटलं की ट्राफिक सिग्नल (Traffic Signal) आलाच. वाहतूक नियंत्रणासाठी सिग्नल असतात. पण गाडीचालकांना कित्येकदा हा ट्रॅफिक सिग्नल म्हणजे कटकट वाटते. हा सिग्नल नसताच तर बरं झालं असतं असंच वाटतं. आता खरंच असं होणार आहे. दोन शहरांमध्ये एकही ट्राफिक सिग्नल नसणार आहे. इथं स्मार्ट पद्धतीनं वाहतूक व्यवस्थापन केलं जाणार आहे. यमुना एक्सप्रेस वे लगत (Yamuna Express Way) टप्पल-बाजाना आणि वृंदावन ही दोन नवी शहरे (New Cities) वसवण्यात येणार आहेत.  यमुना एक्सप्रेस डेव्हलपमेंट अथॉरिटी (Yamuna Express Development Authority) ही दोन शहरे वसवणार आहे. या दोन्ही शहरांमध्ये आॅफिस आणि कंपन्यांसाठी जागा सोडण्यात येणार आहे. पर्यावरणाची विशेष काळजी घेण्यासाठी या शहरांमध्ये ट्रॅफिक सिग्नल नसतील. अलिगडमधील टप्पलनजीक टप्पल-बाजाना अर्बन सेंटर या नावाने तर मथुरेतील रायानजिक वृंदावन या नावाने नवीन शहरे वसवणार आहे. विशेष म्हणजे या शहरात राहणाऱ्या नागरिकांना रोजगारासाठी अन्यत्र दूरवर कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. तसंच उद्योग, व्यवसायदेखील याच शहरात करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. यासाठी अथॉरिटी या नव्या शहरात ऑफिसेस, कंपन्या, दुकानांसाठी जमीन उपलब्ध करून देणार आहे. असा आहे नव्या शहराचा प्लॅन टप्पल-बाजाना अर्बन सेंटर हे शहर 11,104 हेक्टरवर वसवण्यात येणार आहे. यापैकी 1794.4 हेक्टर जमीन उद्योगांसाठी सोडण्यात येणार आहे. येथे लाॅजिस्टीक आणि वेअर हाऊसिंग क्लस्टर विकसित केलं जाणार आहे. 1608.3 हेक्टर जमीन निवासी कारणांसाठी वापरली जाईल. हे नवं शहर सेक्टर 35 नजीक वसवण्यात येणार आहे. हे वाचा -  'नरेंद्र मोदी आणि भारतीयांचे शतशः आभार!' भारताकडून लस मिळाल्यावर या पंतप्रधानांनी केलं भावुक भाषण मथुरेजवळील रायानजीक वसवण्यात येणारं वृंदावन हे शहर पर्यटन हे उद्दिष्ट ठेवून विकसित करण्यात येणार आहे. हे शहर सुमारे 9350 हेक्टरवर वसवलं जाईल. या शहरातील 731 हेक्टरवर केवळ पर्यटन झोन असेल. तसंच 110 हेक्टर रिव्हर फ्रंट विकसित करण्याची योजना आहे. हे शहर यमुना नदी किनारी वसवलं जाईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. पर्यावरणाच्या अनुषंगाने या शहरांमध्ये असतील या खास गोष्टी या नव्या शहरांमध्ये यमुना अथॉरिटी स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (Smart Traffic Management System) लागू करणार आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि चांगल्या दळणवळण सुविधेसाठी येथील रस्त्यांवर खासगी आणि व्यवसायिक वाहनांसाठी स्वतंत्र लेन असतील. तसंच या शहरांमध्ये ट्रॅफिक सिग्नल नसतील. तसंच या शहरांमधून बाहेर पडणारे सांडपाणी यमुना नदीत सोडलं जाणार नसून त्याचा पुनर्वापर केला जाणार आहे. या पाण्याचा वापर शहरातील उद्यानांमध्ये केला जाणार आहे.
Published by:news18 desk
First published:

Tags: Delhi, Traffic, Traffic signal

पुढील बातम्या