नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी : आमच्या देशाला इतक्या लवकर लस मिळेल, असं वाटलंच नव्हतं; असं म्हणत कॅरेबियन बेटांवरचे हे पंतप्रधान भारताच्या मदतीने भारावून गेले आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनाकाळात अनेक देशांना लस पुरवण्याचा निश्चय केला आहे. फक्त 75000 लोकसंख्येच्या आमच्या देशाला या कोरोनाच्या महासाथीत स्वतःकडे निर्मितीक्षमता नसताना एवढ्या लवकर लशीचा पुरवठा होईल, अशी अपेक्षाच नव्हती. पण भारताने आमची साद ऐकली, असं नमूद करत कॅरेबियन बेटांवरच्या एका छोट्या देशाच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भावुक होत आभार मानले.
डॉमिनिकन रिपब्लिक या देशाचे पंतप्रधान रूझवेल्ट स्केरीट (Dominican PM Roosevelt Skerrit) यांनी मंगळवारी भारताचे (India) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर अभिनंदन आणि आभाराचा अक्षरश: वर्षाव केला. त्यांनी भारतीय नागरिकांचेही (Indian Citizens) मनापासून आभार (thanked) मानले.
कॅरिबियन बेटांवरच्या केवळ 72,000 इतकी लोकसंख्या (population) असलेल्या डॉमिनिकन रिपब्लिक या देशानं भारताकडे 35,000 कोविड - 19 लशींची (Covid-19 vaccines) मागणी केली होती. पंतप्रधान रूझवेल्ट यांनी 19 जानेवारी रोजी लशींची गरज असल्याचं सांगितलं होतं. आपल्याला इतक्या लवकर या लस मिळण्याची अजिबातच अपेक्षा नव्हती अशी भावना त्यांनी बोलून दाखवली आहे.
कॅरेबियन बेटांवरचा छोटासा देश डॉमिनिक रिपब्लिकच्या पंतप्रधानांनी PM Roosevelt Skerrit यांनी भारतीय पंतप्रधान मोदींचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. फक्त 72000 लोकसंख्येच्या छोट्या देशाची मागणी इतक्या पटकन आणि सहजपणे मान्य केली आणि मदत केल्याचं त्यांनी म्हटलंय.#CoronaVaccine pic.twitter.com/8TStPrZpGM
— News18Lokmat (@News18lokmat) February 10, 2021
या लशी भारताच्या केंद्र सरकारनं (Central Government) विमानाद्वारे (plane) डॉमिनिकाच्या डग्लस चार्ल्स विमानतळावर मंगळवारी पाठवल्या. पंतप्रधान रूझवेल्ट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अधिकृतपणे या लसी ताब्यात घेतल्या. या सगळ्यांनी मिळून ऑक्स्फर्ड ऍस्ट्राझेन्काच्या (Oxford-AstraZeneca) लसीचे काही बॉक्सेस विमानातून खाली उतरवण्यातही हातभार लावला.
हेही वाचा - लोकसभेत शेतकऱ्यांसाठी मोदींनी केला मोठा खुलासा: कृषी सुधारणा कायदे बंधनकारक नाही
भारताचे आभार मानणाऱ्या भावपूर्ण भाषणात (speech) पंतप्रधान रूझवेल्ट म्हणाले, 'मला हे कबूल केलं पाहिजे, की माझ्या प्रार्थना इतक्या लवकर फळाला येतील याची मी अजिबातच कल्पना केली नव्हती. एखाद्यानं या अशा साथीच्या अपवादात्मक काळात विचार केला असता, की लसीबाबत मदत देताना एखाद्या राष्ट्राचं क्षेत्रफळ आणि ताकद लक्षात घेत ती दिली जावी. मात्र याचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच जातं, की इथं आमची विनंती समतेचं मूल्य आणि गुणवत्तेच्या निकषांवर स्वीकारली गेली.
लस विमानतळावर पोचल्यावर आयोजित करण्यात आलेल्या एका औपचारिक समारंभात पंतप्रधान रूझवेल्ट यांनी हे उदगार काढले. भारतानं डॉमिनिका देशाला केलेली 35,000 लसींची मदत ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करोनाकाळात इतर देशांना मदत करण्याच्या उपक्रमाचा एक भाग आहे. भारतानं आतापर्यंत शेजारी देशांव्यतिरीक्त इतर 25 देशांना 2 कोटी 4 लाख लसी विकत दिल्या आहेत.