मराठी बातम्या /बातम्या /देश /

लोको पायलटच्या मागून भरधाव वेगाने आली ट्रेन; पाहताच दुसऱ्याने वाचवण्यासाठी उडी मारली आणि...

लोको पायलटच्या मागून भरधाव वेगाने आली ट्रेन; पाहताच दुसऱ्याने वाचवण्यासाठी उडी मारली आणि...

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

मागून ट्रेन येताना पाहून एका लोको पायलटला वाचवण्यासाठी दुसरा लोको पायलट धावला पण झाला धक्कादायक शेवट.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jharkhand, India
  • Published by:  Priya Lad

रांची, 21 नोव्हेंबर : दुसऱ्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारे लोक खूपच कमीच असतात. अशीच एक घटना सध्या समोर आली आहे. एका लोको पायलटला वाचवण्यासाठी दुसऱ्या लोको पायलटने स्वतःच्या जीवाची बाजी लावली. पण एकाला वाचवताना त्याच्यासह दुसऱ्याचाही मृत्यू झाला आहे. झारखंडमधील ही धक्कादायक घटना आहे.

राजखरसावा रेल्वे स्टेशनवर हावडा-मुंबई मेल ट्रेनने 2 ऑन ड्युटी लोको पायलट्सना उडवलं आहे. या दोघांचाही मृत्यू झाला आहे. डीके सहाना आणि मो. अख्तर आलम अशी या लोको पायलट्सची नावं आहेत. त्या दोघांचंही वय अनक्रमे 53 आणि 36 वर्षे आहे. सहान प. बंगालच्या बांकुडातील राहणारे होते. तर आलम बर्नपूरमधील रहिवासी होता.

हे वाचा - ओडिसामध्ये मालगाडी घसरली आणि रेल्वे स्थानकावर आदळली, 3 जणांना चिरडलं

शुक्रवारी मध्यरात्री  12.18 ची घटना आहे. माहितीनुसार लोको पायलट डीके सहाना मेमो देण्यासाठी स्टेशन कार्यालयात जात होते. ते ज्या ट्रॅकवरून चालत होते त्याच ट्रॅकवरून हावडा-मुंबई मेल येत होती. त्यांचं लक्ष नव्हतं. पण सहाना यांच्या मागून  ट्रेन येत असल्याचं त्यांचे सहाय्यक लोको पायलट अख्तर यांनी पाहिलं आणि ते इंजिनवरून खाली उतरले. ते धावत सहानांच्या दिशेने गेले. पण अख्तर सहाना यांना वाचवणार त्या आधीच ट्रेन त्यांच्या जवळ आली.  ट्रेनचा वेग इतका होता की काही कळायच्या आतच दोघांनाही ट्रेनने उडवलं. मेल दोघांनाही उडवत धडधड निघून गेली. दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

हे वाचा - देशातील या सुंदर ठिकाणी भारतीयांनाही प्रवेश नाही; फिरण्यासाठी लागते विशेष परवानगी

दरम्यान दैनिक भास्करच्या वृत्तानुसार डीआरएम एजे राठोड यांनी सांगितलं की या प्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले आहेत.

First published:

Tags: Accident, Jharkhand, Railway, Railway accident