ओडिसा, 21 नोव्हेंबर : ओडिसामध्ये रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. एका रेल्वे स्थानकावर मालगाडी रुळावरून घसरली आहे. मालगाडीचे डबे रेल्वे स्थानकावर आदळली आहे. या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. ओडिसातील जाजपूरमधील कोरई रेल्वे स्थानकावर सोमवारी पहाटे 6.40 वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. रेल्वे स्थानकाजवळ भरधाव मालगाडी आली असता अचानक डबे घसरले. त्यानंतर मालगाडीचे काही डबे हे रेल्वे स्थानकावर येऊन आदळले.
Massive train accident at Korai Railway Station in Odisha. A Goods train entered into the platform. Passengers were waiting for morning train . Lots of them have been subsided . pic.twitter.com/rM8iE9ZSgJ
— Arun Sinha #WithRG (@ArunPrasadSinha) November 21, 2022
मालगाडीचे डबे हे रेल्वे स्थानकावर तिकीट घर आणि प्रतिक्षालयापर्यंत पोहोचले होते. स्थानकावर वाट पाहणारे 3 जण यात चिरडले गेले. अनेक प्रवासी हे जखमी झाले आहे. मालगाडीच्या खाली आणखी काही प्रवाशी अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. या अपघातामुळे रेल्वेची दोन्ही मार्गावरील वाहतूक थांबली आहे. या अपघातात स्टेशन भवन दुर्घटनाग्रस्त झाले आहे. (कर्नाटकात रिक्षामध्ये स्फोट, दहशतवादी हल्ल्याचा कट असल्याची शक्यता) जाजपुरचे पोलीस अधीक्षक राहुल पीआर यांनी सांगितलं की, सकाळी मोठ्या संख्येनं कोरेई रेल्वे स्थानकावर प्रवासी हे बलौर-भुवनेश्वर डीएमयूने जाण्यासाठी थांबलेले होते. त्याचवेळी एक भरधाव मालगाडी स्थानकावरून जात असताना अचानक रुळावरून घसरली. ( झोका खेळताना काळजी घ्या! एक चूक आणि जळगावातील मुलाचा जागीच मृत्यू ) रुळावरून घसरल्यानंतर डबे हे थेट रेल्वे स्थानकावर येऊन आदळले. यात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर एका मुलासह 2 जण गंभीर जखमी झाले. डब्यांखाली आणखी लोक अडकल्याची शक्यता आहे. बचाव कार्य सुरू आहे.