मराठी बातम्या /बातम्या /देश /Organ Donation: 14 वर्षीय धार्मिकने पुणे, चेन्नई, पाटणमधील सहा जणांना दिलं जीवनदान

Organ Donation: 14 वर्षीय धार्मिकने पुणे, चेन्नई, पाटणमधील सहा जणांना दिलं जीवनदान

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

आपला मुलगा तर गेला, पण आपल्या मुलामुळे दुसऱ्या कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू फुलणार आहे, असा उदात्त विचार करून त्यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला.

  नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर : दानापेक्षा कोणताही मोठा धर्म नसतो, असं म्हणतात. त्यात सध्याच्या काळाच्या अनुषंगाने विचार करता अवयवदान हे मोठं पुण्यकर्म मानलं जातं. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू हे कोणासाठीही मोठं दुःख असतं; पण त्या व्यक्तीच्या अवयवदानाचा निर्णय घेतला गेला, तर त्यातून अनेकांना नवं जीवन मिळतं. सुरतमधल्या (Surat) 14 वर्षांच्या एका मुलाच्या बाबतीत नुकतीच अशीच एक घटना घडली. तो ब्रेन-डेड (Brain Dead) अर्थात मेंदूमृत झाल्याचं डॉक्टर्सनी घोषित केलं; मात्र त्याच्या आई-वडिलांनी या कठीण प्रसंगी आपल्या मुलाचे अवयव दान (Organ Donation) करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सहा जणांना नवं जीवन मिळालं आहे.

  धार्मिक काकडिया (Dharmik Kakdia) असं या 14 वर्षांच्या मुलाचं नाव आहे. 27 ऑक्टोबरला त्याची तब्येत अचानक बिघडली. त्याच्या आई-वडिलांनी त्याला तातडीने सुरतच्या किरण हॉस्पिटलमध्ये दाखल केलं; मात्र डॉक्टर्सनी तपासणी केल्यानंतर असं लक्षात आलं, की तो ब्रेन-डेड झाला आहे. त्याच्या आई-वडिलांसाठी हा मोठाच धक्का होता. दरम्यान, सुरत शहरातल्या डोनेट लाइफ (Donate Life) संस्थेला ही माहिती मिळताच, त्यांची टीम हॉस्पिटलमध्ये पोहोचली. त्यांनी त्या मुलाच्या आई-वडिलांना अवयवदानाचं महत्त्व समजावून सांगितलं आणि त्यासाठी प्रेरित केलं. आपला मुलगा तर गेला, पण आपल्या मुलामुळे दुसऱ्या कोणाच्या तरी चेहऱ्यावर हसू फुलणार आहे, असा उदात्त विचार करून त्यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यानंतर धार्मिकचे दोन्ही डोळे, हृदय, लिव्हर, फुप्फुसं आणि दोन हात या अवयवांचं दान करण्यात आलं. त्यामुळे सहा जणांना नवं जीवन मिळालं आहे.

  वाचा : मधासोबत करा लवंगाचं सेवन; वजन कमी करण्यासोबतच होतात आश्चर्यकारक फायदे

  त्या मुलाचे हे अवयव चेन्नई, अहमदाबाद आणि मुंबईला तातडीने पोहोचवण्याची आवश्यकता होती. त्यासाठी तीन वेगवेगळे ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आले. त्यामुळे वाहतूक नियंत्रित करण्यात आल्यामुळे हे अवयव योग्य वेळेत त्या त्या शहरांमध्ये पोहोचवण्यात आले.

  धार्मिकचे डोळे किरण हॉस्पिटलमध्येच गरजू व्यक्तीला बसवण्यात आले. धार्मिकचे दोन्ही हात पुण्यातल्या 32 वर्षांच्या एका व्यक्तीला बसवण्यात आले. तसंच, त्याचं हृदय जुनागडमधल्या 15 वर्षांच्या मुलाच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आलं. त्याचं ऑपरेशन अहमदाबादमध्ये झालं. धार्मिकची फुप्फुसं आंध्र प्रदेशातल्या 44 वर्षांच्या व्यक्तीला देण्यात आली. त्याचं ऑपरेशन चेन्नईत करण्यात आलं. त्याचं लिव्हर गुजरातमधल्या पाटणमधल्या 35 वर्षांच्या व्यक्तीला देण्यात आलं. त्याचं ऑपरेशनही अहमदाबादमध्येच झालं. धार्मिकचा मृत्यू झाला असला, तरी त्याच्यामुळे एवढ्या सगळ्या व्यक्तींच्या आयुष्यात आशेचे नवे किरण आले आहेत.

  वाचा : शिंगाडा खाण्याचे एक नव्हे इतके सारे आहेत फायदे, या हंगामात मिळेल खास फायदा

  धार्मिक काकडिया पाच वर्षांचा असल्यापासून किडनीच्या विकाराने ग्रस्त होता. त्याचे वडील अजयभाई काकडिया एका हिरेकंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. धार्मिकची प्रकृती एवढी ढासळली होती, की गेल्या एका वर्षात दर आठवड्यात त्याचं तीन वेळा डायलिसिस करावं लागत असे. वडील अजयभाई आपली किडनी त्याला देण्याच्या तयारीत होते. त्या अनुषंगाने आवश्यक ती तयारी सुरू होती; मात्र 27 ऑक्टोबरला त्याची प्रकृती अचानक ढासळली आणि तो ब्रेन-डेड झाला. त्याच्या आई-वडिलांनी दुःखाच्या प्रसंगी घेतलेल्या धीरोदात्त निर्णयामुळे अनेकांच्या जीवनात आशेचे दीप तेजाळणार आहेत.

  First published:

  Tags: Gujarat, India, Organ donation, Pune