नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर : सर्वजण हंगामी फळे खातात. हिवाळ्यात शिंगाडं (वॉटर चेस्टनट - Water chestnut) खाणं इतर हंगामी फळांप्रमाणेच तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. हिवाळी हंगाम सुरू होताच बाजारात शिंगाड्याची विक्री सुरू झालीय. हे असं फळ आहे, जे पावसाळ्यात उगवतं आणि हिवाळ्याच्या सुरुवातीला बाजारात येऊ लागतं. याच शिंगाड्याचं पीठ उपवासाला खाल्लं जातं. पण हंगामी ताजं फळ म्हणून याचं सेवन केल्यास तुम्हाला अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो. चला तर, शिंगाड्याच्या फायद्यांविषयी (Water Chestnut or Singhada Benefits) जाणून घेऊ.
निद्रानाशाची तक्रार दूर होते
तुम्ही फळ म्हणून दररोज शिंगाड्याचं सेवन करू शकता. तुम्हाला निद्रानाशाचा त्रास होत असेल, तर या समस्येवर मात करण्यासाठी तुम्हाला शिंगाडं उपयुक्त ठरू शकतं. याचं सेवन केल्यानं तुम्हाला चांगली झोप लागण्यास सुरुवात होईल.
टॉन्सिल्स आणि वेदना आराम
शिंगाड्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात आणि ते घशाच्या अनेक समस्या दूर करण्यास देखील मदत करतं. घसा खवखवणे आणि टॉन्सिलच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही शिंगाड्याचा उपयोग नक्की करून पहा.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते
अनेकांना फळं खाल्ल्यामुळं रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची भीती वाटते. मात्र, शिंगाड्यानं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. मधुमेही रुग्णही याचं सेवन सहज करू शकतात.
हे वाचा - T20 World Cup : श्रीलंकेच्या हसरंगाने इतिहास घडवला, वनडेनंतर आता टी-20 मध्येही हॅट्रिक!
गॅस आणि अपचनापासून आराम मिळतो
पोटाच्या समस्या कमी करण्यासाठी शिंगाड्याचं सेवन करणंदेखील खूप फायदेशीर आहे. यामुळे गॅस, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता आणि अपचन यांसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. तसंच भूक न लागण्याची समस्या कमी होण्यास मदत होते.
दात आणि हाडं होतील मजबूत
शिंगाड्याचं पाणी शरीरातील कमजोरी दूर करण्यास मदत करतं. एवढंच नाही तर, दात आणि हाडं मजबूत करण्याचं कामही हे फळ सहजतेनं करतं. यामध्ये भरपूर कॅल्शियम आढळतं, ज्यामुळे ते दात आणि हाडांसाठी चांगलं मानलं जातं.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips