मुंबई,2 नोव्हेंबर- माणसाला आरोग्य चांगलं राखण्यासाठी व्यायाम करायला हवा आणि चांगला आहार घ्यायला हवा. रोगप्रतिकार शक्ती चांगली राखण्यासाठीही अनेक गोष्टी लोक करतात. कोरोना महामारीमुळे रोगप्रतिकारशक्तीचं (Immunity) महत्त्व जगभरातील लोकांना पटलं आहे. त्यामुळे आता लोक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विविध आयुर्वेदिक औषधं घ्यायला लागले आहेत. या वर्षी तर इम्युनिटी या नावाने दिवाळी अंकही प्रसिद्ध झाले आहेत. आपली रोगप्रतिकारशक्ती कशी बळकट करायची याबद्दल अनेक उपाय आयुर्वेदात सांगितले आहेत. आपल्या दैनंदिन वापरात असलेल्या अनेक मसाले, पदार्थांचा वापर आपण यासाठी करू शकतो. आजीबाईच्या बटव्यात असे अनेक उपाय आहेत. त्यापैकीच एक उपाय आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. स्वयंपाकघरात असणारी लवंग (Clove) आणि मध (Honey) यांचं सेवन केल्याने तुमच्या आरोग्याला चांगला फायदा होऊ शकतो. तुम्ही हे दोन्ही पदार्थ स्वतंत्रपणे वापरले असतील किंवा त्यांची चवही घेतली असेल. पण लवंग आणि मध एकत्रित चाटण करून चाटलं तर तुम्हाला अधिक फायदा (Benefits) होतो. त्यातून मिळणारे फायदे दुप्पट **(Double Benefits)**असतात. लवंग आणि मध दोन्ही अँटिबॅक्टिरियल आहेत. अँटिफंगल आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे त्यांचा अधिक फायदा होतो. हिवाळा सुरू होतो आहे अशा वेळी जर तुम्ही लवंगाची पूड मधात मिश्रित करून घेतली तर अनेक फायदे होतात. जाणून घेऊया काय फायदे होऊ शकतात ते. खोकला कमी होतो थंडीच्या दिवसांत खोकला येणं आणि घश्याची खवखव या गोष्टी सगळ्यांनाच त्रास देतात. ती लवंगांची पूड करून घ्या आणि ती एक चमचा मधात टाकून त्याचं चाटण करा आणि ते खा म्हणजे खोकला (Cough) निघून जातो. घश्याची खवखव तर बंद होईलच पण त्याला आराम पडेल. घश्यात इन्फेक्शनमुळे दुखणं जाणवत असेल तर ते ही दूर होईल. यकृताची स्वच्छता होते मध आणि लवंगाचं मिश्रण यकृताला डिटॉक्सिफाय करतं (Detoxification of Liver). रक्तातली साखर नियंत्रणात ठेवण्यासही हे मिश्रण मदत करतं. त्यामुळे तुम्ही तीन लवंगांची पूड एक चमचा मधात घालून त्याचं चाटण सेवन करू शकता. (हे वाचा: शिंगाडा खाण्याचे एक नव्हे इतके सारे आहेत फायदे, या हंगामात मिळेल खास फायदा ) वजनही कमी करतं वजन कमी करण्यासाठीही मध आणि लवंगाचं चाटण फार उपयुक्त ठरतं. त्यासाठी मध आणि लवंगाचा चहा (Tea) तुम्ही पिऊ शकता. या दोन्हीमुळे शरीरातील कॅलरी जळतात. त्यामुळे भूकही कमी लागते आणि पचनसंस्था मजबूत होते. याचा उपयोग वजन कमी करायला होतो. तोंड आल्यावरही उपयुक्त कधीकधी तोंड आल्यामुळे काहीच करता येत नाही. खूप त्रास होतो. अशीवेळी लवंगाची पूड घ्या त्यात एक चमचा मध टाका ते मिश्रण चांगलं एकत्र करा. ते चाटण तयार होईल. हे चाटण तोंड आलेल्या ठिकाणी, जिभेवर लावा आणि काही काळासाठी काहीही खाऊ नका. तुमचा त्रास कमी होईल. मध आणि लवंगाचं चाटण रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याबरोबरच इतरही अनेक दृष्टिंनी उपयुक्त आहे त्यामुळे त्याचा वापर तुम्ही करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.