धनबाद, 01 फेब्रुवारी : झारखंडमधील धनबादमध्ये आगीची भीषण घटना घडली आहे. एका रहिवासी इमारतीला भीषण आग लागली. या आगीमध्ये आतापर्यंत 3 लहान मुलांसह 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. दुर्दैवी दुर्घटनेमध्ये 12 जण जखमी झाले आहे. जखमींवर उपचार सुरू आहे. या घटनेमुळे झारखंडमध्ये खळबळ उडाली आहे. लग्न समारंभादरम्यान आगीची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धनबादमधील आशीर्वाद टॉवरमध्ये एका अपार्टमेंटला आग लागली. रात्री 11 च्या सुमारास ही घटना घडली. या अपार्टमेंटमध्ये एक लग्न सोहळा सुरू होता. साहजिक लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.
Jharkhand | Visuals from outside Dhanbad apartment where a massive fire broke out. Rescue operation is still underway at the site. pic.twitter.com/3aZZ1MnbPn
— ANI (@ANI) January 31, 2023
अचानक आग लागली आणि त्यामुळे एकच गोंधळ उडाला. आगीमध्ये 3 आणि दुसरा मजला भक्षस्थानी सापडला. आगीचा भडका उडाल्यामुळे अनेक जण अडकून पडले होते. या आगीमध्ये 3 लहान मुलांसह एकूण 12 जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सर्व जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आग कशामुळे लागली याची माहिती समोर आली नाही.
(डोक्यावर वार, रिटायर्ड प्रोफेसर पती पत्नीची निर्घृण हत्या, भयानक घटनेने शहर हादरलं!)
दरम्यान, या दुर्दैवी घटनेबद्दल मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. ही घटना दुर्दैर्वी आणि ह्रदयद्रावक आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. मी स्वत: घटनेवर लक्ष ठेवून आहे.
(2 मुलांची आई माहेरचं कारण सांगून निघाली अन् सापडली हॉटेलमध्ये, अस फुटलं बिंग)
तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनबादमधील आगीच्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. मृतकांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींना 50 हजारांची मदत देण्यात आली आहे. या दुर्दैवी दुर्घटनेमध्ये 12 जण जखमी झाले आहे. जखमींवर उपचार सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.