हल्दवानी, 31 जानेवारी : पती-पत्नीच्या नात्यात संशयाला जागा झाली, की ते नातं विस्कटून जातं आणि आजकाल पती पत्नीच्या वेगळे होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तसेच विवाहबाह्य संबंधांमध्येही वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. यातून मग घटस्फोट तसेच काही ठिकाणी हत्येच्याही घटना उघडकीस येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
उत्तराखंडच्या हल्दवानी जिल्ह्यात एका पतीनं पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं. त्यामुळे त्याचा संशय खरा ठरला. माहेरी जाते असं सांगून घरातून निघालेल्या पत्नीचा पाठलाग करून त्यानं त्या दोघांनाही हॉटेलमध्ये पकडलं. हॉटेलच्या खोलीतून काही आक्षेपार्ह गोष्टीही त्याला मिळाल्या. त्यानंतर पोलिसांनी त्या तिघांना पोलीस ठाण्यात नेऊन समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यानंतरही नवऱ्यानं बायकोला घरी घेऊन जायला नकार दिला.
उत्तराखंडच्या हल्दवानीमध्ये ही घटना घडली आहे. नवऱ्याला बायकोबाबत शंका होती. पत्नी आपल्याला फसवत असल्याबाबत नवऱ्याला संशय होता. सोमवारी (30 जानेवारी) हा संशय खरा ठरला. त्याची पत्नी घरातून माहेरी जाते असं सांगून निघाली. घरातून निघून ती तिच्या प्रियकरासोबत एका हॉटेलमध्ये गेली. पत्नीचा पाठलाग करत पतीही त्या हॉटेलमध्ये पोहोचला तेव्हा त्याचा संशय खरा ठरला. त्यानं हॉटेलमध्ये खूप गोंधळ केला. मीडियासोबत पोलिसांनाही त्यानं बोलावलं.
मिळालेल्या वृत्तानुसार, हे जोडपं हल्दवानीच्या पिलीकोठी भागात राहतं. त्यांना 2 मुलं आहेत. नवऱ्याला त्याच्या बायकोवर काही दिवसांपासून संशय होता. बायकोचे कोणाशी तरी अनैतिक संबंध असल्याचं त्याला वाटत होतं; मात्र त्याच्याकडे कोणताही पुरावा नव्हता. सोमवारी पत्नी माहेरी जाते असं सांगून घरातून निघाली, तेव्हा नवऱ्याने तिचा पाठलाग केला. तेव्हा त्याचा संशय खरा ठरला. बायको एका तरुणाला जाऊन भेटली व ते दोघं पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या खानचंद मार्केटमध्ये एका हॉटेलमध्ये गेले. त्यांच्या मागे जाऊन नवऱ्यानं त्या दोघांना रंगेहाथ पकडलं.
हेही वाचा - विवाहितेचा मृत्यू, हुंड्यासाठी हत्या केल्याचा माहेरच्या लोकांचा आरोप, गूढ उकलण्याचं पोलिसांसमोर आव्हान
पतीने त्या हॉटेलमध्ये गोंधळ घालण्यास सुरुवात केली. हॉटेलच्या खोलीमधून त्याला काही सामानही मिळालं. त्याने पत्नीच्या थोबाडीत मारली व पोलिसांनाही बोलावलं. पोलिसांनी त्या ठिकाणी येऊन त्या तिघांनाही पोलीस ठाण्यात नेलं. तिथे गेल्यावर नवरा-बायकोचं समुपदेशन करण्यात आलं; मात्र नवऱ्यानं बायकोला घरी घेऊन जाणार नसल्याबाबत पुन्हा पुन्हा सांगितलं. पोलिसांनी याबाबत कोणताही गुन्हा अद्याप दाखल केलेला नाही.
बायकोच्या अशा कृत्यामुळे नवरा हवालदिल झाला असून, पोलिसांनी समजावूनही त्यानं बायकोला घरी नेण्यास नकार दिला. नवरा-बायकोचं विश्वासाचं नातं एका चुकीमुळे पार तुटून जाऊ शकतं. त्याचंच उदाहरण हल्दवानी पोलीस ठाण्यात पाहायला मिळालं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.