मराठी बातम्या /बातम्या /देश /ब्रिटिशकालीन 100 वर्ष जुना पूल तुटला, 138 चाकी ट्रॉलीचा भीषण अपघात

ब्रिटिशकालीन 100 वर्ष जुना पूल तुटला, 138 चाकी ट्रॉलीचा भीषण अपघात

मध्य प्रदेशच्या नर्मदापुरममध्ये रविवार भीषण अपघात झाला. ब्रिटिशकालीन 100 वर्ष जुना पूल तुटल्यानं 138 चाकी ट्रॉली थेट पुलाच्या तळाशी जाऊन पडली. मध्य प्रदेशातील नर्मदापुरम जिल्ह्यातील भोपाळ-नागपूर महामार्ग-69 वर ही दुर्घटना घडली.

नर्मदापुरम, 10 एप्रिल : देशभरातील अनेक ब्रिटिशकालीन पूल आता मोडकळीला आलेले आहेत. त्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांची दुरुस्ती किंवा वापरायोग्य नसल्याबद्दलची कारवाई होणं आवश्यक आहे. असं न झाल्यामुळं अनेक सर्वसामान्य लोकांसाठी जिवावरचं संकट येऊ शकतं. अतिपावसानंतर सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यामुळे झालेल्या दुर्घटनेतून हेच दिसून आलं. मात्र, कधी प्रशासन तर कधी लोक याबाबतीत कमालीचा हलगर्जीपणा करताना दिसतात.

अशाच पद्धतीनं ब्रिटिशकालीन 100 वर्ष जुना पूल तुटल्यानं मोठा अपघात झाला आहे. या अपघातात 138 चाकी ट्रॉली थेट पुलाच्या तळाशी जाऊन पडली. मध्य प्रदेशातील नर्मदापुरम जिल्ह्यातील भोपाळ-नागपूर महामार्ग-69 वर ही दुर्घटना घडली. ब्रिटिशांनी बांधलेला 100 वर्षे जुना पूल रविवारी कोसळला. त्यामुळे भोपाळ ते नागपूर दरम्यानची वाहतूक ठप्प झाली आहे. येथील रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे वाहतूक इतर रस्त्यांनी वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुखतवा नदीवर हा पूल बांधण्यात आला होता. नर्मदापुरमच्या सुखतवा शहरात बांधलेला हा पूल सुमारे 25 फूट उंच होता. पुलावरून मोठी ट्रॉली जात असताना हा अपघात झाला. ट्रॉली पुलावरून पुढे जाताच पुलाचा काही भाग नदीत पडला. या अपघातात ट्रॉली चालकासह चार जण जखमी झाले आहेत.

हे वाचा - IndiGo Airlinesची भरारी! बनली जगातली सहावी सर्वांत मोठी विमान कंपनी

ही ट्रॉली 138 चाकी असल्याचं सांगण्यात येत आहे. ते अवजड मशिनने इटारसी पॉवर ग्रीडकडे जात होते. या पुलावरून दररोज साडेचार हजारांहून अधिक वाहने ये-जा करतात. ही ट्रॉली 6 मार्च रोजी हैद्राबाद येथून अवजड यंत्रांसह बाहेर पडली. ती रस्त्यात खराब झाली आणि तीन दिवसांपेक्षा जास्त काळ बैतूलमध्ये महामार्गाच्या बाजूला उभा करून ठेवावा लागली. दरम्यान, ती दुरुस्त करण्यासाठी अभियंते पोहोचले आणि रविवारी ट्रॉली पुन्हा रवाना झाली होती.

हे वाचा - अनोखा सामना : महिला घुंघट घालून खेळल्या कबड्डी, पुरुष धोतर नेसून धावले शर्यतीत

ट्रॉलीवर 120 टन वजनाचे मशीन होते

ट्रॉलीवर ठेवण्यात आलेले अवजड यंत्र 20 फूट रुंद आणि 17 फूट उंच असल्याचे सांगण्यात येत आहे. हे मशीन तोशिबा कंपनीने बनवले आहे. मशीनचं वजन 120 टनांपेक्षा जास्त आहे. या ट्रॉलीमध्ये 16 एक्सल आणि 128 टायर आहेत. तर समोरच्या भागात 10 टायर बसवले आहेत. त्यांनी ही ट्रॉली खेचली जाते.

First published:

Tags: Container accident, Road accidents in india, Truck accident