मराठी बातम्या /बातम्या /देश /सापामुळे झाला Chain Accident! ट्रकने मारला ब्रेक, बसने तोडले बॅरिकेड्स; रिक्षाचालकाचा मोडला पाय!

सापामुळे झाला Chain Accident! ट्रकने मारला ब्रेक, बसने तोडले बॅरिकेड्स; रिक्षाचालकाचा मोडला पाय!

महामार्गावरची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू होती.  अचानक एका ट्रक चालकाला रस्त्यावर साप असल्याचं दिसलं.  त्यानं करकचून ब्रेक मारला आणि झाला एक विचित्र अपघात.

महामार्गावरची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू होती. अचानक एका ट्रक चालकाला रस्त्यावर साप असल्याचं दिसलं. त्यानं करकचून ब्रेक मारला आणि झाला एक विचित्र अपघात.

महामार्गावरची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू होती. अचानक एका ट्रक चालकाला रस्त्यावर साप असल्याचं दिसलं. त्यानं करकचून ब्रेक मारला आणि झाला एक विचित्र अपघात.

चेन्नई, 5 जानेवारी:  महामार्गावर (Highway) अचानक एक साप (Snake) अवतरला आणि त्यामुळे साखळी अपघाताला (Chain Accident) निमंत्रण मिळालं. तमिळनाडूतील (Tamil Nadu) हायवेवर समोर साप असल्याचे पाहून ट्रक चालकाने अचानक करकचून ब्रेक (Break) मारला. त्यामुळे ट्रक मध्ये भरलेले एक टन लोखंडी रोलर (Iron roller) अचानक रस्त्यावर पडले. या घटनेमुळे इतरही वाहनांनी ब्रेक मारले आणि अपघाताची एक विचित्र मालिकाच समोर आली. 

असा झाला अपघात

तमिळनाडूमधील विलुपुरम जिल्ह्या जवळ चेन्नई-त्रिची  या राष्ट्रीय महामार्गावर भयंकर अपघात घडला.  एक ट्रक चेन्नई बंदरातून थुथुकुडी  जिल्ह्याकडे चालला होता.  या ट्रकमध्ये एक टन लोखंडी रोलर भरले होते.  ट्रक वेगाने चालला असता अचानक चालकाला रस्त्यात  साप असल्याचं दिसलं.  त्यामुळे त्याने करकचून ब्रेक मारला आणि ट्रक मधील लोखंडी रोलर रस्त्यावर पडले. 

बसने तोडले बॅरिकेड्स

या ट्रकच्या पाठीमागून एक सरकारी बस चालली होती.  चेन्नईहून मदुराई कडे चाललेल्या या बसच्या चालकाने टक्कर टाळण्यासाठी अचानक डावीकडे वळण घेतले.  मात्र त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बसनं  बॅरिकेड्स तोडले.  त्याच वेळी विरुद्ध दिशेनं एक रिक्षा येत होती. या रिक्षाची बसला जोरदार धडक बसली आणि रिक्षाचालकाचा पाय  फ्रॅक्चर झाला. या घटनेत रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला.  बसमधील चालक आणि वाहक यांच्यासह दहा पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले. 

हे वाचा -

पोलीस तपास सुरू

पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून ट्रकचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.  जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.  या अपघातामुळे चेन्नई-त्रिची आणि  सालेम-चेन्नई या मार्गावर बराच वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. केवळ एका सापामुळे हा भयानक अपघात झाला आणि अनेक प्रवाशांना त्याचा भुर्दंड सोसावा लागला. तमिळनाडूत सध्या याच घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. 

First published:

Tags: Accident, Major accident, Snake, St bus, Tamilnadu, Truck accident