जाहिरात
मराठी बातम्या / देश / तिरुपती बालाजी मंदिरास व्यावसायिकाची खास भेट, 1 कोटींची सोन्याचांदीची तलवार केली अर्पण

तिरुपती बालाजी मंदिरास व्यावसायिकाची खास भेट, 1 कोटींची सोन्याचांदीची तलवार केली अर्पण

तिरुपती बालाजी मंदिरास व्यावसायिकाची खास भेट, 1 कोटींची सोन्याचांदीची तलवार केली अर्पण

हैदराबादच्या एका भाविकाने आंध्र प्रदेशच्या या तिरुमाला तिरुपती बालाजी मंदिरात (Tirumala Tirupati Balaji Temple) थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल एक कोटी रुपयांच्या किंमतीची तलवार भेट दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

हैदराबाद, 20 जुलै: देशभरात अशी काही देवस्थानं आहेत जिथं भाविक मोठ्या प्रमाणात दानधर्म करत असतात. सोनंनाणं, पैसे, अन्नधान्य इ. स्वरुपात हे दान केलं जात. काही देवस्थानं देशातील श्रीमंत देवस्थांनं म्हणून ओळखली जातात. दरम्यान तिरुमाला तिरुपती बालाजी मंदिरातही मोठ्या प्रमाणात दानधर्म केला जातो. काही भाविक मंदिरासाठी काही विशिष्ट वस्तू देखील भेट देतात. हैदराबादच्या (Hyderabad Based Businessman offers 1 crore gold sword to Tirupati Balaji Temple) एका भाविकाने आंध्र प्रदेशच्या या तिरुमाला तिरुपती बालाजी मंदिरात (Tirumala Tirupati Balaji Temple)  थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल एक कोटी रुपयांच्या किंमतीची तलवार भेट दिली आहे. भगवान वेंकटेश्वरना भेट देण्यात येणाऱ्या तलवारीमध्ये दोन किलो सोनं आणि तीन किलो चांदी आहे. मंदिरातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार ही तलवार पाच किलोची आहे. व्यावसायिक असणाऱ्या या भाविकाने त्यांच्या पत्नीसह उपस्थित राहात मंदिरातील अधिकाऱ्यांकडे ही तलवार सुपूर्द केली आहे. हे वाचा- दिल्लीत ‘ड्रोन जिहाद’चा इशारा, स्वातंत्र्यदिनापूर्वीच हल्ल्याची शक्यता या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भाविकाने ही ‘सूर्यकट्यार’ (Suryakataari) मंदिरासाठी अर्पण केली आहे. सूर्यकटारी म्हणून ही तलवार ओळखली जाते. ही तलवार तिरुमाला-तिरुपती देवस्थानमचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी ए वेंकट धर्मा रेड्डी यांनी (A Venkata Dharma Reddy) यांनी प्राप्त केली. ही तलवार दोन किलो सोन्याची आणि तीन किलो चांदीची असून तिची किंमत एक कोटी रुपये आहे. **हे वाचा-** मराठीत ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा तामिळनाडूमधील कोयंबटूरमध्ये असणाऱ्या तज्ज्ञ ज्वेलर्सनी ही तलवार तयार केली असून त्यासाठी सुमारे सहा महिन्यांचा कालावधी लागल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान भगवान वेंकटेश्वरांना अशी महागडी सोन्याची तलवार सादर करण्याची ही पहिली वेळ नाही. 2018 मध्ये देखील अशीच एक तलवार अर्पण करण्यात आली होती. एका कापड व्यापाऱ्याने त्यावेळी अशी तलवार अर्पण केली होती, ज्याची किंमत सुमारे 1.75 कोटी रुपये होती. अशी माहिती मिळते आहे की, त्या तलवारीमध्ये सुमारे सहा किलो सोनं वापरण्यात आलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: hyderabad
  • First Published :
जाहिरात
जाहिरात