मराठी बातम्या /बातम्या /देश /दिल्लीत ‘ड्रोन जिहाद’चा इशारा, स्वातंत्र्यदिनापूर्वीच हल्ल्याची शक्यता, सुरक्षा यंत्रणा सतर्क

दिल्लीत ‘ड्रोन जिहाद’चा इशारा, स्वातंत्र्यदिनापूर्वीच हल्ल्याची शक्यता, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीरमध्ये एअरफोर्सच्या तळावर (Air force base) झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर (drone attack) आता दिल्लीमध्ये अशाच प्रकारचा हल्ला होण्याची शक्यता (drone jihad) गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

काश्मीरमध्ये एअरफोर्सच्या तळावर (Air force base) झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर (drone attack) आता दिल्लीमध्ये अशाच प्रकारचा हल्ला होण्याची शक्यता (drone jihad) गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

काश्मीरमध्ये एअरफोर्सच्या तळावर (Air force base) झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर (drone attack) आता दिल्लीमध्ये अशाच प्रकारचा हल्ला होण्याची शक्यता (drone jihad) गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

दिल्ली, 20 जुलै: काश्मीरमध्ये एअरफोर्सच्या तळावर (Air force base) झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर (drone attack) आता दिल्लीमध्ये अशाच प्रकारचा हल्ला होण्याची शक्यता (drone jihad) गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. सध्या सुरु असलेलं संसदेचं पावसाळी अधिवेशन (Monsoon session) आणि काश्मीरमधून कलम 370 (article370) हटवल्याचा 5 ऑगस्टला येणारा वर्धापनदिन हे निमित्त साधत पाकिस्तानी दहशतवादी दिल्लीत स्फोट करण्याच्या तयारीत असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी (intelligence agencies) दिला आहे. त्यामुळे दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

‘ड्रोन जिहाद’ची शक्यता

भारतीय सीमा पार करून मानवी घुसखोरी करण्याचे पाकिस्तानचे बहुतांश प्रयत्न भारतीय लष्करानं हाणून पाडले आहेत. त्यामुळे सीमेपलिकडील दहशतवाद्यांकडून आता ड्रोनचा वापर केला जात आहे. एअरबेसवरील हल्ल्यानंतरही जम्मू काश्मीरच्या वेगवेगळ्या भागात असे ड्रोन आढळले होते. त्यातील अऩेक ड्रोनवर पोलिसांनी कारवाई केली होती. मात्र आता पुन्हा एकदा ड्रोनचा वापर करून त्यातून स्फोटकं पाठवण्याची तयारी दहशतवादी संघटनांकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सुरक्षेत वाढ

दिल्ली पोलिसांनी सर्व युनिट्सना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून ड्रोन हल्ल्याशी मुकाबला करण्याचं प्रशिक्षण मिळालेल्या टीम दिल्लीत तैनात करण्यात आल्या आहेत. दिल्लीत यंदा 4 अँटी ड्रोन सिस्टीम बसवण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी केवळ दोन अँटी ड्रोन सिस्टिम लावण्यात आल्या होत्या. मात्र यंदा त्यांची संख्या दुप्पट करण्यात आली आहे.

हे वाचा -चिंताजनक! लसीकरण झालेल्या महिला डॉक्टरला Coronaच्या दोन व्हेरिएंटची लागण

ड्रोनची लढण्याचं विशेष प्रशिक्षण

पोलीस आणि सैन्यातील काहीजणांना ड्रोनचा मुकाबला करण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आलं आहे. यामध्ये Soft Kill आणि Hard Kill असे दोन्ही प्रकार त्यांना शिकवण्यात आले आहेत. एखादा संशयास्पद ड्रोन सीमेपलिकडून आपल्या हद्दीत येत असेल, तर त्याला तिथेच ब्लॉक कसं करावं, याचं वेगळं प्रशिक्षण, तर आपल्या भागातील एखाद्या संशयास्पद ड्रोनला नष्ट कसं करायचं, याचंही वेगळं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यासाठी इंडियन एअरफोर्सच्या मुख्यालयात कंट्रोल रूम उभारण्यात आली आहे.

First published:

Tags: Delhi, Drone shooting, Terror acttack