मराठी बातम्या /बातम्या /nashik /

केंद्रीय राज्य मंत्री भारती पवार यांना अश्रू अनावर, सासूंच्या गळ्यात पडून रडल्या VIDEO

केंद्रीय राज्य मंत्री भारती पवार यांना अश्रू अनावर, सासूंच्या गळ्यात पडून रडल्या VIDEO

डॉ.भारती पवार यांनी आज कळवण तालुक्यातील दळवट येथे त्यांचे सासरे माजी मंत्री कै. ए.टी. पवार यांच्या समाधी स्थळावर जाऊन दर्शन घेतले.

डॉ.भारती पवार यांनी आज कळवण तालुक्यातील दळवट येथे त्यांचे सासरे माजी मंत्री कै. ए.टी. पवार यांच्या समाधी स्थळावर जाऊन दर्शन घेतले.

डॉ.भारती पवार यांनी आज कळवण तालुक्यातील दळवट येथे त्यांचे सासरे माजी मंत्री कै. ए.टी. पवार यांच्या समाधी स्थळावर जाऊन दर्शन घेतले.

मनमाड, 21 ऑगस्ट : जन आशीर्वाद यात्रेचा (jan ashirwad yatra) समारोप झाल्यानंतर केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री डॉ.भारती पवार (bharti pawar) यांनी त्यांचे सासरे माजी मंत्री कै.ए.टी. पवार (a t pawar) यांच्या यांच्या समाधीस्थळावर जाऊन दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या भावना अनावर झाल्या आणि सासुच्या गळ्यात पडून रडल्या. यावेळी कार्यकर्त्यांनाही गहिवरून आले होते. केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांची पालघर येथून सुरू झालेल्या जन आशीर्वाद यात्रेचा धुळ्याला समारोप झाली. त्यानंतर आज त्यांनी कळवण तालुक्यातील दळवट येथे त्यांचे सासरे माजी मंत्री कै. ए.टी. पवार यांच्या समाधी स्थळावर जाऊन दर्शन घेतले. यावेळी ए.टी. पवार यांना अभिवादन करून श्रद्धांजली वाहताना डॉ.भारती पवार भावनिक झाल्या होत्या. त्यांच्या डोळ्यातून पाणी तरळले आणि त्यानंतर सासूंनी त्यांना धीर दिला. सासूंच्या गळ्यात पडताच त्यांना रडू कोसळले. यावेळी उपस्थित नातेवाई आणि कार्यकर्त्यांनी देखील अश्रू अनावर झाले होते. जिथं तिथं ऐकू येतोय फक्त एकच आवाज, YouTuber हैराण; म्हणाला, 'मला मदत करा' भारती पवार यांची पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळात निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भारती पवार यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याने मोठी चर्चा झाली होती. भारती पवार यांचीही मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आणि त्यांना मंत्रिपद मिळाले. कपिल पाटील यांनी सरपंचाच्या खुर्चीला केलं वंदन केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या पाच दिवस सुरू असलेल्या जन आशीर्वाद यात्रेचा समारोप भिवंडी (bhiwandi) तालुक्यातील दिवे अंजुर या त्यांच्या मूळगावी झाला. त्यामुळे होमग्राऊंडमध्ये त्यांचं भव्य स्वागत झाल्यावर सर्वप्रथम त्यांनी ग्रामदेवतेचे दर्शन घेतलं. त्यानंतर आपल्या कुटुंबीयांसह थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले व तेथील ग्रामपंचायत सरपंच खुर्चीस वंदन केले, त्यावेळी त्यांना गहिवरून आले होते.

शेतकऱ्यांसाठी GOOD NEWS! आता स्मार्टफोनवरच समजणार मातीचं आरोग्य

कपिल पाटील यांनी 1988 मध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात दिवे अंजुर ग्रामपंचायतीचे सरपंच पदापासून सुरू केली होती. त्यानंतर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विविध पदे भूषवित थेट राज्यमंत्री पदाला गवसणी घातली आहे.
First published:

पुढील बातम्या