लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी नाशिक, 23 ऑक्टोबर : नाशिकच्या (Nashik) शिवसेना पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा विसर पडायला का? असा सवाल उपस्थित होत आहे. याचं कराण म्हणजे शिवसेनेने लावलेल्या होर्डिंगवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचाच फोटो नसल्याचं (Uddhav Thackeray and Aaditya Thackeray photo missing from Shiv Sena banner) दिसून आलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या हस्ते बिटको रुग्णालयाचे हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे नामकरण करण्यात आले. या रुग्णालयाच्या समोरच शिवसेनने मोठे होर्डिंग्ज (Shiv Sena hording) लावले आहेत त्यात बाळासाहेब ठाकरे, संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यांसाह नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची छबी आहे. स्वतः नाशिकरोडचे सभापती प्रशांत दिवे यांची ही मोठी छबी आहे मात्र मुख्यमंत्रीची छबीच दिसत नाहीये. विशेष म्हणजे रुग्णालयाचे भूमिपूजन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं आहे. मात्र कार्यक्रमाला महापौर, आयुक्त यांची ही अनुपस्थिती राहिली. याबाबत न्यूज १८ लोकमतने या कार्यक्रमाचे निमंत्रक प्रशांत दिवे यांना विचारले असता त्यांनी हा होर्डिंग महापालिकेने लावला असल्याचं उडवा उडवीच उतरत देत या प्रकरणी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.
नाशिकमधील बिटको रुग्णलायचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नामकरण pic.twitter.com/hOOhg00pEG
— News18Lokmat (@News18lokmat) October 23, 2021
वाचा : “आमच्याकडे तक्रारदारच गायब आहे, पण खटला सुरू आहे” मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा परमबीर सिंग यांच्यावर निशाणा आगामी महापालिका निवडणुकीसाठी शिवसैनिक सज्ज झाले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार राऊत यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नाशिकमध्ये दोन दिवस विविध विकासकामांचे उद्घाटन व शिवसैनिकांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. संजय राऊत म्हणाले, विकास कामे म्हणजे काय तसेच इथले शिवसेनेचे नगरसेवक काय करू शकतात हे नाशिकमध्ये आल्यावर समजले. यंदा नाशिकमध्ये शिवसेना सत्तास्थानी राहणार असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. तसेच कामाच्या माध्यामतून आपल्याला लोकांपर्यंत पोहचावे लागेल. ही कामे म्हणजेच शिवसेनेची ओळख असल्याचे राऊत यांनी सांगितले नाशिक महापालिका निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर असून, ‘मिशन महापालिके’चा भाग म्हणून शिवसेना नेते व खासदार संजय राऊत नाशिकच्या मैदानात उतरले आहेत. वाचा : ‘क्रीडा संकुल उभारलं तेव्हाच्या पालकमंत्र्यांना जोड्याने मारलं पाहिजे’ उदयनराजे संतापले, पाहा VIDEO 22 ते 24 ऑक्टोबर असे तीन दिवस राऊत नाशिक दौऱ्यावर आले आहेत. महापालिकेसोबतच जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचाराचाही बिगूल ते वाजविणार आहेत.नाशिक महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी 2022 मध्ये होणार आहे. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असून, ही सत्ता मिळवण्यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नाशिक महापालिकेवर भगवा फडकवण्याची घोषणा संजय राऊत यांनी सहा महिन्यांपूर्वीच केली आहे. त्यानंतर संघटनात्मक फेरबदल केल्यानंतर राऊत यांनी नाशिकमध्ये लक्ष घातले आहे. शुक्रवार पासून राऊत नाशिक दौऱ्यावर आले आहेत. शनिवारी शहरात त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.

)







