मराठी बातम्या /बातम्या /nashik /

मोठी बातमी! कोरोनानंतर नाशिक Mucormycosis चा हॉटस्पॉट, 8 बळी तर 166 जण बाधित

मोठी बातमी! कोरोनानंतर नाशिक Mucormycosis चा हॉटस्पॉट, 8 बळी तर 166 जण बाधित

कोरोनाच्या आकडेवारीने नाशिकमध्ये उच्चांक गाठले होते. दरम्यान आता नाशिक जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा (Mucormycosis in Nashik) धोका वाढला आहे.

कोरोनाच्या आकडेवारीने नाशिकमध्ये उच्चांक गाठले होते. दरम्यान आता नाशिक जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा (Mucormycosis in Nashik) धोका वाढला आहे.

कोरोनाच्या आकडेवारीने नाशिकमध्ये उच्चांक गाठले होते. दरम्यान आता नाशिक जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा (Mucormycosis in Nashik) धोका वाढला आहे.

नाशिक, 21 मे: नाशिकमधील रोगराईचा धोका काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे. गेल्यावर्षीपासून नाशिक जिल्ह्यातील अनेक भाग विशेषत: मालेगाव कोरोनाचा हॉटस्पॉट (Coronavirus Hotspot) ठरले आहेत. कोरोनाच्या आकडेवारीने नाशिकमध्ये उच्चांक गाठले होते. दरम्यान आता नाशिक जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा (Mucormycosis in Nashik) धोका वाढला आहे. नाशिकमध्ये म्युकरमायकोसिसचे 8 बळी गेल्याने संपूर्ण जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. मालेगाव आणि नाशिक शहरामध्ये म्युकरमायकोसिसमुळे बळी गेले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आता अधिकच सजग झाली आहे. मात्र कोरोनामुळे कोलमडून पडलेली आरोग्य व्यवस्था म्युकरमायकोसिसचा सामना कसा करणार, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

कोरोनाची दाहकता कमी व्हायला सुरुवात झाली तर म्युकरमायकोसिसनं चिंता वाढवली. आरोग्य यंत्रणांची पुन्हा एकदा तारेवर कसरत सुरू झाली आहे. दरम्यान, टास्क फोर्स स्थापन करण्यात आला असून प्रतिकारशक्ती आणि मानसिक स्थैर्य वाढवण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम आरोग्य यंत्रणेनं सुरू केली आहे. उपचारासाठी आवश्यक एम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनचा साठा नाशकात दाखल झाला असून, पात्र रूग्णांना, सिव्हिल हॉस्पिटल मधून वितरण करण्यात आलं आहे.

हे वाचा-कोरोनाच्या लढाईत नांदेडच्या या ZP सदस्याचं मोलांचं काम, PM मोदींनीही घेतली दखल

कोव्हिडमधून बरे झालेल्यांना म्युकरमायकोसिसचा धोका आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 166 म्युकरमायकोसिस बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी यातील 34 रुग्णं बरे झाले असून 132 रुग्णांवर उपचार सुरू आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांपैकी 106 रुग्णांवर खाजगी हॉस्पिटलमध्ये, तर 24 रुग्णांवर अधिग्रहित कोविड सेंटरमध्ये, दोघांवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 34 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असला तरी सक्रीय रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे कोरोनानंतर आता म्युकरमायकोसिसला देखील गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. आरोग्य यंत्रणा त्यादृष्टीने पावलं उचलत आहे.

हे वाचा-कोरोना लशींसाठी राज्यांचं ग्लोबल टेंडर; जगाला लस देणाऱ्या भारतावर अशी वेळ का?

डिस्टार्ज देण्यात आलेल्या 34 रुग्णांपैकी 33 रुग्णांनी खाजगी तर एका रुग्णाने सरकारी रुग्णालयात उपचार घेत म्युकरमायकोसिसवर मात केली आहे. याकरता एम्फोटेरेसीन बी च्या 200 इंजेक्शन साठा प्राप्त झाला असून त्याचं वाटप करण्यात आलं आहे.

First published:

Tags: Corona, Corona hotspot, Coronavirus