मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

119 जण पॉझिटिव्ह असताना गाव कोरोनामुक्त करण्यासाठी नांदेडच्या ZP सदस्याचं मोलांचं काम, PM मोदींनीही घेतली दखल

119 जण पॉझिटिव्ह असताना गाव कोरोनामुक्त करण्यासाठी नांदेडच्या ZP सदस्याचं मोलांचं काम, PM मोदींनीही घेतली दखल

कोरोनाविरोधाती लढाईत अनेक व्यक्तींनी, गावांनी, देशांनी जगासमोर आदर्श ठेवला आहे. त्यांनी कोरोनाशी लढण्यासाठी (India Fights Corona) नवी उमेद प्रत्येकाला दिली आहे. कोरोनाला हरवू शकतो, असा विश्वास दिला आहे. या यादीमध्ये आता महाराष्ट्रातील एका गावाचाही समावेश होतो आहे

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar

नांदेड, 21 मे: कोरोनाशी सुरू (Coronavirus) असणारी अखंड मानवजातीची लढाई खूप मोठी आहे. हा लढा दीर्घकाळ सुरू असला तरी अनेक व्यक्तींनी, गावांनी, देशांनी जगासमोर आदर्श ठेवला आहे. त्यांनी कोरोनाशी लढण्यासाठी (India Fights Corona) नवी उमेद प्रत्येकाला दिली आहे. कोरोनाला हरवू शकतो, असा विश्वास दिला आहे. या यादीमध्ये आता महाराष्ट्रातील एका गावाचाही समावेश होतो आहे अन् नांदेडमधील या गावाच्या कामाची दखल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देखील घेतली आहे. नांदेडमध्ये असणाऱ्या भोसी (Bhosi, Nanded) गावातील गावकऱ्यांनी काही नियमांचं पालन करून कोरोनाला हरवलं आहे. त्यांनी ज्याप्रकारे कोरोनाशी दोन हात केले त्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कौतुक केलं आहे.

दोन महिन्यापूर्वी भोसीमध्ये एका लग्नसमारंभात एका मुलीला कोरोना झाला होता. काही दिवस गेल्यानंतर आणखी पाच कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य असणाऱ्या प्रकाश देशमुख-भोसीकर यांनी पुढाकार घेत गावात कोव्हिड चाचण्या व्हाव्यात यासाठी कंबर कसली. ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाच्या मदतीने गावात कोरोना चाचण्या घेतल्यानंतर याठिकाणी 119 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं. त्यावेळी पुरा गाव हादरला होता. पण देशमुख यांनी परिणामकारक काम केलं आणि गावाची कोरोनाच्या तावडीतून सूटका केली.

हे वाचा-कोविड सेंटरमध्ये महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी राज्य सरकारकडून एसओपी जाहीर

कोरोनाचे संक्रमण रोखण्याची Break the Chain अत्यंत आवश्यक आहे. भोसी गावाने देखील तेच केले. त्यांनी सर्व रुग्णांना विलगीकरणात ठेवले. या रुग्णांनी जवळपास 15 ते 17 दिवस त्यांच्या शेतात आयसोलेशन मध्ये राहण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला. ज्यांच्याकडे शेत नव्हतं त्यांची सोय देशमुख यांनी स्वत: केली. त्यांच्या शेतात त्यांनी 40 बाय 60 फूट आकाराची तात्पुरती शेड बांधली आणि तिथे रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं. अंगणवाडी सेविकां याठिकाणी दररोज भेट देत असतं. 15 ते 20 दिवस विलगीकरणात राहिल्यानंतर या सर्वांच्या चाचण्या कोरोना निगेटिव्ह आल्या होत्या.

पंतप्रधानांनी थोपटली पाठ

ग्रामीण भागात योग्य आणि आवश्यक सुविधा नसल्याने कोरोनाविरोधातील लढा अधिकच कठीण आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या विषयाची माहिती दिली. ग्रामीण भागात कोव्हिडबद्दल जागरुगता निर्माण करणं आणि पंचायत राज व्यवस्थांकडू मदत मिळवणं हे महत्त्वाचं असल्याचं यावेळी पंतप्रधान म्हणाले.

First published:

Tags: Corona, Corona hotspot, Corona updates, Coronavirus, Coronavirus cases