नाशिक, 28 जून: नाशिकमधील (Nashik) इगतपुरी इथं रेव्ह पार्टी प्रकरणाला (Igatpuri rave party) धक्कादायक वळण मिळालं आहे. या प्रकरणी बिग बॉस फेम अभिनेत्री हिना पांचाळसह (Heena Panchal) दोन कोरियोग्राफर आणि एक विदेशी महिलेला अटक करण्यात आली आहे. कोरोनाचं संकट भयावह होत असल्याने नाशिक जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टोरंट पर्यटन स्थळांवर गर्दी करण्यास बंदी असतानाही इगतपुरी परिसरातील स्काय ताज व्हीला आणि स्काय लगुन व्हीला या दोन बंगल्यामध्ये काही तरुण तरुणी अवैधरित्या पार्टी केली होती. या कारवाईत 10 पुरुष 12 महिला असे एकूण 22 जण अवैधरित्या ड्रग्स आणि हुक्क्याचे सेवन करतांना मद्यधुंद अवस्थेत मिळुन आले होते. या छाप्यात कोकेनसह इतर अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. ताब्यात घेतलेले महिलांपैकी काही महिलांनी साउथ आणि बॉलिवूड फिल्ममध्ये अभिनय केलेला असून काही महिला कोरिओग्राफर आहे. यातील एक महिला ही परदेशी अर्थात इराणची नागरिक आहे. फेक फेसबुक अकाऊंटवरून सेक्स रॅकेट; तुमच्या नावाचाही असा गैरवापर तर होत नाही ना? पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, मुंबई येथील पीयूषच्या वाढदिवसानिम्मित इगतपुरी येथील मानस रिसॉर्ट हद्दीती स्काय ताज व्हीला येथे मुबंई व पुणे येथील दहा पुरुष आणि बारा महिला यांनी रेव्ह पार्टी केली. या पार्टीत बॉलिवूडची अभिनेत्री हिना पांचालसह 2 कोरियोग्राफर, एक विदेशी महिला अझार फारनुद यांच्या सह पीयुष शेट्टींया, आरव, विशाल मेहता, रोहित अरोरा, अकिब ,वरून, बाफना, करिश्मा, चांदणी भटीजा, श्रुती शेट्टी, रुचिरा नार्वेकर, शनैया कौर, आषिता, शीना, प्रीती चौधरी, कौशिकी असे एकूण 22 जण ताब्यात आहे. मित्रांसोबत बहिणीकडं गेला अन्…; पिंपरीत भरदिवसा सराईतावर कोयत्यानं सपासप वार पोलिसांच्या छाप्यात घटनास्थळाहून कॅमेरा, ट्राय पॉड, मादक द्रव्य जप्त करण्यात आल्यानं, या प्रकरणाचं गांभीर्य वाढले आहे. शहरातील महामार्गा लगत आणि निसर्ग, डोंगर भागात विविध खाजगी बंगले आणि रिसॉर्ट असून यात अनेकदा रेव्ह पार्टी , मादक पदार्थाची तस्करी खुले आम सुरू असल्यानं स्थानीक पोलीस, प्रशासनाचा अजिबात धाक शिल्लक नसल्याची चर्चा स्थानकात कायम होत असते. या पार्टीतील,काहींनी रात्रीतुनच पळ काढल्याची माहिती समोर आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.