मराठी बातम्या /बातम्या /nashik /

Chhagan Bhujbal आणि Suhas Kande यांच्यातील वाद मिटला नाही तर... ? जयंत पाटलांनी म्हटलं....

Chhagan Bhujbal आणि Suhas Kande यांच्यातील वाद मिटला नाही तर... ? जयंत पाटलांनी म्हटलं....

Chhagan Bhujbal आणि Suhas Kande यांच्यातील वाद मिटला नाही तर... ? जयंत पाटलांनी म्हटलं....

Chhagan Bhujbal आणि Suhas Kande यांच्यातील वाद मिटला नाही तर... ? जयंत पाटलांनी म्हटलं....

Jayant Patil on Chhagan Bhujbal and Suhas Kande clash: नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आहेत आणि तेच राहतील अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे.

येवला, 1 ऑक्टोबर : छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (Shiv Sena MLA Suhas Kande) यांच्यातील संघर्ष अद्यापही कायम आहे. दोन्ही नेत्यांत खडाजंगी झाली. त्यानंतर नियोजन समितीचा निधी भुजबळांनी विकल्याचा आरोप आमदार सुहास कांदे यांनी करत न्यायालयात धाव घेतली. तसेच छगन भुजबळ यांना पालकमंत्रिपदावरुन हटवण्याचंही सुहास कांदे यांनी म्हटलं. दोन्ही नेत्यांमध्ये सुरू असलेल्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आहेत आणि तेच राहतील असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार यांच्यातला वाद हा स्थानिक असून अंडरवर्ल्डमधून धमकी देण्यासारखा गंभीर वाद नाही. भुजबळ आमचे नेते आहेत, हा वाद मिटेल आणि नाही मिटला तर मुख्यमंत्र्यांसमोर वाद मिटवला जाईल असे ही पाटील यांनी सांगितले. जयंत पाटील सध्या नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज ते येवल्यात आले होते यावेळी प्रसार माध्यमांशी बोलत होते.

सुहास कांदे यांच्यासह अक्षय निकाळजेला पोलीस समन्स बजावणार

आमदार सुहास कांदे यांनी पोलिसांना पत्र लिहून आपल्याला अंडरवर्ल्डमधून धमकी आल्याचा दावा केला. या प्रकरणी आता नाशिक पोलिसांकडून छोटा राजनचा पुतण्या आणि रिपाई आठवले गटाचे नेते अक्षय निकाळजे (Akshay Nikalje) यांना नाशिक पोलीस (Nashik Police) समन्स बजावणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंडवर्ल्डकडून धमकी आल्याच्या प्रकरणात नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी चौकशीसाठी सम्स पाठवण्याचे आदेश दिले आहेत. लवकरच अक्षय निकाळजे याचा पोलीस जबाब नोंदवणार असून त्यासाटी सन्स बजावण्यात येणार आहे. यासोबतच आमदार सुहास कांदे यांच्या कॉल रेकॉर्डिंगचीही तपासणी करुन त्यांचाही जबाब नोंदवणार असल्याची माहिती समोर येत आहे.

भुजबळ यांच्या विरोधात आमदार सुहास कांदेंची हायकोर्टात धाव

शिवसेना आमदार सुहास कांदे यांची भुजबळांच्या विरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. नियोजन समितीचा निधी भुजबळांनी विकल्याचा आमदार सुहास कांदे यांचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी सुहास कांदे यांनी थेट न्यायालयातच धाव घेतली आहे. या याचिकेत जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी देखील प्रतिवादी आहेत. भुजबळांनी निधी विकल्याचे पाचशे पुरावे असल्याचा आमदार सुहास कांदे यांचा दावा आहे.

सुहास कांदेंना धमकीचा फोन?

सुहास कांदे यांनी काही दिवसांपूर्वी पोलिसांकडे पत्र लिहून तक्रार दिली आहे. या तक्रारीमध्ये अंडरवर्ल्डमधून धमकी आल्याचा दावा कांदे यांनी केला आहे. छोटा राजनच्या पुतण्याने फोनकरून धमकी दिल्याचा दावा कांदेंनी केला होता. 27 तारखेला संध्याकाळी सुहास कांदे यांना अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा पुतण्या अक्षय निकाळजे याने फोन केला होता. उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे अन्यथा तुझ्या कुटुंबाचे चांगले होणार नाही, अशी धमकी फोनवर दिली असल्याचं सुहास कांदे म्हणाले होते.

आरोपानंतर अक्षय निकाळजे काय म्हणाले होते?

अक्षय निकाळजे यांनी एक पत्रकार परिषद घेत आमदार सुहास कांदे यांचे आरोप फेटाळून लावले होते. सुहास कांदे हे खोटे आरोप करत आहेत. माझी आणि छगन भुजबळ यांची कुठलीही चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी म्हटलं. तसेच भुजबळांविरोधात दाखल याचिका मागे घेण्याच्या धमकीचा कोणताही संबंध नाहीये. सुहास कांदे हे पल्बिसिटी स्टंट करत आसल्याचंही त्यांनी म्हटलं.

First published:

Tags: Chagan bhujbal, Jayant patil, Nashik