मराठी बातम्या /बातम्या /nashik /

Bhujbal vs Kande: Shiv Sena MLA सुहास कांदे यांच्यासह अक्षय निकाळजेला पोलीस समन्स बजावणार

Bhujbal vs Kande: Shiv Sena MLA सुहास कांदे यांच्यासह अक्षय निकाळजेला पोलीस समन्स बजावणार

Bhujbal vs Kande: Shiv Sena MLA सुहास कांदे यांच्यासह अक्षय निकाळजेला पोलीस समन्स बजावणार

Bhujbal vs Kande: Shiv Sena MLA सुहास कांदे यांच्यासह अक्षय निकाळजेला पोलीस समन्स बजावणार

Shiv Sena MLA Suhas Kande vs Chhagan Bhujbal: छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यातील वादात धमकी प्रकरणात पोलीस अक्षय निकाळजेचा जबाब नोंदवणार आहेत.

नाशिक, 1 ऑक्टोबर : नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि शिवसेना आमदार सुहास कांदे (Shiv Sena MLA Suhas Kande) यांच्यातील वादात अंडरवर्ल्डची धमकी (Threat call from underworld) आल्याने एकच खळबळ उडाली. भुजबळांनी निजोयन समितीचा निधी विकल्याचा आरोप सुहास कांदे यांनी करत न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर आमदार सुहास कांदे यांनी पोलिसांना पत्र लिहून आपल्याला अंडरवर्ल्डमधून धमकी आल्याचा दावा केला. या प्रकरणी आता नाशिक पोलिसांकडून छोटा राजनचा पुतण्या आणि रिपाई आठवले गटाचे नेते अक्षय निकाळजे (Akshay Nikalje) यांना नाशिक पोलीस समन्स बजावणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Shiv Sena vs NCP: भाजीपाला विकणारे Bhujbal 25 वर्षांत 25 हजार कोटींचे मालक कसे झाले? आमदार Suhas Kande यांचा सवाल

मिळालेल्या माहितीनुसार, अंडवर्ल्डकडून धमकी आल्याच्या प्रकरणात नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी चौकशीसाठी सम्स पाठवण्याचे आदेश दिले आहेत. लवकरच अक्षय निकाळजे याचा पोलीस जबाब नोंदवणार असून त्यासाटी सन्स बजावण्यात येणार आहे. यासोबतच आमदार सुहास कांदे यांच्या कॉल रेकॉर्डिंगचीही तपासरणी करुन त्यांचाही जबाब नोंदवणार असल्याची माहिती समोर येत आहे.

भुजबळ यांच्या विरोधात आमदार सुहास कांदेंची हायकोर्टात धाव

शिवसेना आमदार सुहास कांदे यांची भुजबळांच्या विरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. नियोजन समितीचा निधी भुजबळांनी विकल्याचा आमदार सुहास कांदे यांचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी सुहास कांदे यांनी थेट न्यायालयातच धाव घेतली आहे. या याचिकेत जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी देखील प्रतिवादी आहेत. भुजबळांनी निधी विकल्याचे पाचशे पुरावे असल्याचा आमदार सुहास कांदे यांचा दावा आहे.

सुहास कांदेंना धमकीचा फोन?

सुहास कांदे यांनी काही दिवसांपूर्वी पोलिसांकडे पत्र लिहून तक्रार दिली आहे. या तक्रारीमध्ये अंडरवर्ल्डमधून धमकी आल्याचा दावा कांदे यांनी केला आहे. छोटा राजनच्या पुतण्याने फोनकरून धमकी दिल्याचा दावा कांदेंनी केला होता. 27 तारखेला संध्याकाळी सुहास कांदे यांना अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा पुतण्या अक्षय निकाळजे याने फोन केला होता. उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे अन्यथा तुझ्या कुटुंबाचे चांगले होणार नाही, अशी धमकी फोनवर दिली असल्याचं सुहास कांदे म्हणाले होते.

आरोपानंतर अक्षय निकाळजे काय म्हणाले होते?

अक्षय निकाळजे यांनी एक पत्रकार परिषद घेत आमदार सुहास कांदे यांचे आरोप फेटाळून लावले होते. सुहास कांदे हे खोटे आरोप करत आहेत. माझी आणि छगन भुजबळ यांची कुठलीही चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी म्हटलं. तसेच भुजबळांविरोधात दाखल याचिका मागे घेण्याच्या धमकीचा कोणताही संबंध नाहीये. सुहास कांदे हे पल्बिसिटी स्टंट करत आसल्याचंही त्यांनी म्हटलं.

First published:

Tags: Chagan bhujbal, Nashik, Shiv sena