मराठी बातम्या /बातम्या /nashik /Chhagan Bhujbal यांच्या विरोधात शिवसेना MLA Suhas Kande यांची हायकोर्टात धाव, नियोजन समितीचा निधी विकल्याचा आरोप

Chhagan Bhujbal यांच्या विरोधात शिवसेना MLA Suhas Kande यांची हायकोर्टात धाव, नियोजन समितीचा निधी विकल्याचा आरोप

'भुजबळांविरोधात माझ्याकडे 500 पुरावे' शिवसेना आमदाराची हायकोर्टात धाव  (फाईल फोटो)

'भुजबळांविरोधात माझ्याकडे 500 पुरावे' शिवसेना आमदाराची हायकोर्टात धाव (फाईल फोटो)

Shiv Sena MLA Suhas Kande vs NCP Chhagan Bhujbal: शिवसेनेचे आमदार सुहास कांदे आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे.

नाशिक, 24 सप्टेंबर : महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) सर्वकाही आलबेल नसल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (NCP senior leader Chhagan Bhujbal) आणि शिवसेना आमदार सुहास कांदे (Shiv Sena MLA Suhas Kande) यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. त्यानंतर आता आमदार सुहास कांदे यांनी भुजबळांच्या विरोधात थेट हायकोर्टात (High Court) धाव घेतली आहे. नियोजन समितीचा निधी भुजबळांनी विकल्याचा आरोप आमदार सुहास कांदे यांनी केला आहे.

महाविकास आघाडीच्या दोन नेत्यांमध्ये पुन्हा वाद उफाळल्याचं दिसून येत आहे. शिवसेना आमदार सुहास कांदे यांची भुजबळांच्या विरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. नियोजन समितीचा निधी भुजबळांनी विकल्याचा आमदार सुहास कांदे यांचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी सुहास कांदे यांनी थेट न्यायालयातच धाव घेतली आहे. या याचिकेत जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी देखील प्रतिवादी आहेत. भुजबळांनी निधी विकल्याचे पाचशे पुरावे असल्याचा आमदार सुहास कांदे यांचा दावा आहे.

काही दिवसांपूर्वी कांदे आणि भुजबळ यांच्यात खडाजंगी

11 सप्टेंबर रोजी छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात एका बैठकीत जोरदार खडाजंगी झाली होती. नाशिकचे पालकमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा नांदगावचा अतिवृष्टी दौरा वादळी ठरला होता. तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत शिवसेनेचे आमदार आणि भुजबळ यांच्यात जोरदार खडाजंगी पाहण्यास मिळाली. यामुळे काही काळ सभागृहात तणावाचे वातावरण पाहण्यास मिळाले होते.

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ हे अतिवृष्टी भागाचा आढावा घेण्यासाठी नांदगावात पोहोचले होते. तहसील कार्यलयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ व शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यात जोरदार खडाजंगी पाहण्यास मिळाली.

शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे माजी खासदार अनंत गिते यांनी थेट शरद पवार आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला होता. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात राष्ट्रवादीतील काही स्थानिक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमात भाषण करताना अनंत गिते यांनी थेट राष्ट्रवादी आणि शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. अनंत गिते यांनी म्हटलं, मला जाणीव आहे की शिवसेनेचा नेता या व्यासपीठावरुन बोलतोय. मी आज कोणतंही राजकीय भाष्य करणार नाहीये. शिवसेना काय आहे आणि शिवसैनिकांची जबाबदारी काय हे सांगत आहे. राज्यात आपलं सरकार आहे. आपलं कशासाठी म्हणायचं तर मुख्मयंत्री आपले आहेत. पण बाकी काँग्रेस, राष्ट्रवादी आपले नाहीत. आघाडीचं सरकार आहे. सत्ता आघाडीचे नेते सांभाळतील, तुमची आमची जबाबदारी काय आहे तर गाव सांभाळायचं आहे. आपलं गाव सांभाळायच असताना आम्हाला आघाडीचा विचार करायचा नाहीये... आघाडी आघाडीचं पाहून घेईल.

शिवसेना ही काँग्रेसच्या विचाराची कदापी होऊ शकणार नाही

या आघाडीत तीन घटक आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. काँग्रेस सुद्धा काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा काँग्रेसच आहे. हे एकमेकांचे तोंज पाहत होते का, यांचं एकमेकांचं जमतय का, यांचा विचार एक आहे का? दोन काँग्रेस एक विचाराची होऊ शकत नाही तर शिवसेना ही काँग्रेसच्या विचाराची कदापी होऊ शकणार नाही असंही अनंत गिते म्हणाले होते.

राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून

अनंत गिते पुढे म्हणाले, मुळात राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. मग त्या दोन काँग्रेस जर एक होऊ शकत नाही तर आम्ही त्यांच्या विचाराचे होणं कदापी शक्य नाही. जरी राज्यात आघाडी सरकार असलं तरी आम्ही आघाडी सैनिक नाही आम्ही शिवसैनिक आहोत आणि शिवसैनिकच राहणार.

दुसरा कुठलाही नेता त्याला कुणीही किती उपाधी देवो, कुणी जाणता राजा म्हणो.. कुणी आणखी काय म्हणो... पण आणचे गुरू तो होऊ शकत नाही. आमचे गुरू केवळ बाळासाहेब ठाकरे आहेत. ही आघाडी केवळ सत्तेची तडजोड आहे. ज्या दिवशी तुटेल त्या दिवशी तुम्ही आपल्याच घरी येणार. आपलं घर भक्कम करण्यासाठी आपल्याला ताकद वाढवायची आहे असंही अनंत गिते म्हणाले होते.

First published:
top videos

    Tags: Chagan bhujbal, Nashik, NCP, Shiv sena