मराठी बातम्या /बातम्या /nashik /

घरी सोडण्याच्या बहाण्यानं बसस्टॉपला थांबलेल्या तरुणीवर बलात्कार, नाशकातील आरोपीला 10 वर्षांचा तुरुंगवास

घरी सोडण्याच्या बहाण्यानं बसस्टॉपला थांबलेल्या तरुणीवर बलात्कार, नाशकातील आरोपीला 10 वर्षांचा तुरुंगवास

अकरावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीनं सोमवारी आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.  (File Photo)

अकरावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीनं सोमवारी आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. (File Photo)

Rape in Nashik: घरी सोडण्याचा बहाणा करत आरोपीनं बस स्थानकावर मुक्कामी बसची वाट पाहणाऱ्या (Girl waiting on bus stop) तरुणीवर बलात्कार केला होता. याप्रकरणी आरोपीला न्यायालयानं शिक्षा सुनावली आहे.

  • Published by:  News18 Desk

नाशिक, 03 जुलै: बस स्थानकावर मुक्कामी बसची वाट पाहणाऱ्या (Girl waiting on bus stop) तरुणीवर घरी सोडण्याचा बहाणा करत तिच्यावर बलात्कार (Rape on minor girl) केल्याप्रकरणी आरोपी तरुणाला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं (Nashik district court) दहा वर्षांचा तुरुंगवास (10 Years Imprisonment) सुनावला आहे. संबंधित पीडित मुलीला जवळपास चार वर्षांनी न्याय मिळाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. दंड न भरल्यास आणखी तरुंगवासात आणखी तीन महिन्यांची वाढ केली जाईल, असंही न्यायालयानं निकालपत्रात म्हटलं आहे.

सागर दिलीप भोये असं शिक्षा झालेल्या दोषी तरुणाचं नाव आहे. आरोपीनं 3 ऑक्टोबर 2017 रोजी दिंडोरी तालुक्यातील मांदाने याठिकाणी तरुणीला आपल्या घरी नेऊन बलात्कार केला होता. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती. बलात्कार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पीडितेनं वनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी आरोपी सागर विरुद्ध बाल लैंगिक अत्याचारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. यानंतर चार वर्षांनी नाशिक जिल्हा न्यायालयानं पीडितेला न्याय मिळवून दिला आहे.

हेही वाचा-अपघाताचा बनाव रचून शिक्षकाचा काढला काटा; CCTVमुळे उलगडला प्रेमाचा त्रिकोण

नेमकं प्रकरण काय आहे?    

टीव्ही9 ने दिलेल्या वृत्तानुसार, 3 ऑक्टोबर 2017 रोजी पीडित तरुणी रात्री उशीरा वनी बस स्थानकात मुक्कामी बसची वाट पाहत होती. दरम्यान बस स्थानकात एकटी मुलगी पाहून आरोपी सागर दिलीप भोये यानं तिला घरी नेऊन सोडतो असा बहाणा बनवला. उशीर झालाय, बस मिळण्याचीही शक्यता कमी असल्यानं पीडितेनं आरोपीला भला व्यक्ती समजून त्याच्यावर विश्वास ठेवला. आणि आरोपीसोबत घरी जाण्यास तयार झाली. आरोपी पीडितेला आपल्या दुचाकीवर बसवून घेऊन गेला.

हेही वाचा-खंडणी दे अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करेल; कोल्हापूरात सासूची जावयाला धमकी

पण आर्ध्या रस्त्यात गेल्यानंतर आरोपीनं मंदाणा येथे मुलीच्या घरी जाण्याऐवजी त्यानं तिला आपल्या घरी नेलं. फार उशीर झाला आहे, तू माझ्याच घरी थांब असा बहाणा आरोपीनं पीडितेला रात्री मुक्कामी थांबवून घेतलं. पण रात्री तिच्यासोबत काय होणार याचा तिला अंदाजही आला नव्हता. आरोपीनं रात्री पीडितेवर बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी पीडितेनं नाशकातील वनी पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता.

First published:

Tags: Nashik, Rape, Verdict