मराठी बातम्या /बातम्या /kolhapur /

खंडणी दे अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करेल; कोल्हापूरात सासूची जावयाला धमकी

खंडणी दे अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करेल; कोल्हापूरात सासूची जावयाला धमकी

Crime in Kolhapur: कोल्हापूरातील जयसिंगपूर याठिकाणी एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथील एका सासूनं आपल्या जावयाला दहा लाख रुपयांची खंडणी मागितली आहे.

Crime in Kolhapur: कोल्हापूरातील जयसिंगपूर याठिकाणी एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथील एका सासूनं आपल्या जावयाला दहा लाख रुपयांची खंडणी मागितली आहे.

Crime in Kolhapur: कोल्हापूरातील जयसिंगपूर याठिकाणी एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथील एका सासूनं आपल्या जावयाला दहा लाख रुपयांची खंडणी मागितली आहे.

  • Published by:  News18 Desk

कोल्हापूर, 03 जुलै: 'माहेरी आलेल्या पत्नीला घरी घेऊन जायचं असेल; तर दहा लाख रुपयांची खंडणी (Demand ransom) दे, नाहीतर पत्नीला बलात्काराचा गुन्हा (Rape case) दाखल करायला लावेल' अशा शब्दांत सासूनं आपल्या जावयाला धमकी (Threat to son in law) दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडित जावयानं पत्नी आणि सासूसहित पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी खंडणीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) केला असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

सासू संगीता गायकवाड, पत्नी आशा बेनाडी (दोघी रा. कुरूंदवाड), स्वप्निल नाईक (रा. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले), संजय महाडिक (रा. शेडशाळ), संतोष हातनाळे (रा. कोथळी) अशी गुन्हा दाखल झालेल्या पाच आरोपींची नावं आहेत. 30 वर्षीय पीडित पती लखन आण्णाप्पा बेनाडे यांनी ही तक्रार जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नसून या घटनेची चौकशी केली जात आहे.

हेही वाचा-नवरा अन् मुलींचा चुकला काळजाचा ठोका; बाल्कनीतून उडी घेत विवाहितेची आत्महत्या

पुढारीनं दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित आरोपींनी 29 जून रोजी येथील जयसिंगपूर येथील नटराज हॉटेल समोर धमकी दिली होती. फिर्यादी लखन आण्णाप्पा बेनाडे आणि आरोपी पत्नी आशा बेनाडे यांचं काही वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. पण घरगुती कारणामुळे पत्नी माहेरी निघून आली होती. नवऱ्यानं वारंवार विनवणी करूनही पत्नीनं नांदायला यायला नकार दिला. दरम्यानं सासू संगीता गायकवाड आणि पत्नी आशा बेनाडे यांनी आरोपी नाईक, महाडिक, हातनाळे यांच्या संगनमतानं ही खंडणी मागितली आहे.

हेही वाचा-'त्या' फोननंतर पुण्याच्या डॉक्टर दाम्पत्यामध्ये झाला होता वाद; सुसाइट नोटमध्ये..

पत्नी आशाला सासरी पाठवण्यासाठी आरोपींनी पती लखन बेनाडे याच्याकडून दहा लाख रुपयांची खंडणी मागितली होती. शिवाय खंडणी दिली नाही तर, पत्नीला तुझ्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करायला  लावेल, अशी धमकीही आरोपी सासूकडून देण्यात आली आहे. धमकी दिल्यानंतर पती लखन बेनाडे यांनी पत्नी आणि सासूसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी खंडणीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवला असून घटनेचा तपास सुरू केला आहे.

First published:

Tags: Crime news, Kolhapur, Rape