Home /News /maharashtra /

अनैतिक संबंधातून शिक्षकाचा काढला काटा; अपघाताचा रचला बनाव, CCTVमुळे उलगडला प्रेमाचा त्रिकोण

अनैतिक संबंधातून शिक्षकाचा काढला काटा; अपघाताचा रचला बनाव, CCTVमुळे उलगडला प्रेमाचा त्रिकोण

Murder in Dhule: अनैतिक संबंधात (immoral relationship) अडथळा ठरणाऱ्या एका शिक्षकाचा (Teacher) कारने धडक (Car accident) देऊन हत्या (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे.

    धुळे, 03 जुलै: अनैतिक संबंधात (Immoral relationship) अडथळा ठरणाऱ्या एका शिक्षकाचा (Teacher) कारने धडक (Car accident) देऊन हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका सीसीटीव्ही (CCTV) फुटेजमुळे हत्येचं हे गूढ उलगडलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींनी अटक (2 arrest) केली आहे. आरोपी दोघांनी कट रचून संबंधित शिक्षकास मुंबई-आग्रा महामार्गावर नेऊन हत्या केली आहे. यानंतर आरोपींनी अपघाताचा बनाव रचला होता. पण त्यांचा हा बनाव फार काळ टिकू शकला नाही. पोलिसांनी एका सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हत्येचं बिंग फोडलं आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. संदीपकुमार विश्वासराव बोरसे असं हत्या झालेल्या शिक्षकाचं नाव आहे. धुळे तालुक्यातील सरवड गावातील रहिवासी असणारे बोरसे धुळे शहरातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. मयत शिक्षक बोरसे यांची पत्नी आणि मुख्य आरोपी शरद दयाराम राठोड यांच्या मागील काही काळापासून अनैतिक संबंध सुरू होते. पत्नीच्या अनैतिक संबंधाची माहिती बोरसे यांना मिळाली होती. त्यामुळे बोरसे हे आरोपी राठोडकडे सातत्यानं पैशाची मागणी करत असत. हेही वाचा-पहाटे नवरा घरी आल्याचं समजून दार उघडलं; अन् विवाहितेचं आयुष्य झालं उद्धवस्त त्याचबरोबर दोघांनाही दारुचं व्यसन होतं. त्यामुळे ते अनेकदा दारु पिण्यासाठी एकत्र येत असतं. मृत बोरसे यांच्याकडून होणाऱ्या पैशाच्या मागणीमुळे आरोपी राठोड त्रासला होता. त्यामुळे त्यानं आपला अन्य एक मित्र राकेश उर्फ दादा मधुकर कुवर याच्याशी संगनमत करत बोरसे यांच्या हत्येचा कट रचला. यानंतर दोन्ही आरोपींनी ठरलेल्या दिवशी पार्टीच्या नावाखाली त्यांनी मयत बोरसेला इनोव्हा गाडीत बसवून मुंबई -आग्रा महामार्गावरील एका हॉटेलमध्ये नेले. याठिकाणी मद्यपान केल्यानंतर त्यांनी सरवड फाट्याजवळ मृत बोरसे यांना गाडीतून सोडलं. हेही वाचा- Extra Marital Affair of Women: देशात विवाहित महिलांमधील अफेअरचं प्रमाण का वाढतय? सर्वेक्षणातून धक्कादायक खुलासा दरम्यान बोरसे पायी घराकडे जात असताना आरोपींनी वेगात येऊन इनोव्हा गाडीनं त्यांना जोरदार टक्कर मारली. ही धडक इतकी भीषण होती की बोरसे यांचा जागीच मृत्यू झाला. पण त्यानंतर आरोपी मृत बोरसे यांच्या अंत्यसंस्कारालाही आले नाहीत. त्यामुळे नातेवाईकांचा संशय बळवला आणि त्यांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तपास करत असताना, घटनेच्या दिवशी संबंधित आरोपी आणि मृत बोरसे एका हॉटेलमध्ये मद्यपान करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आढळले आहेत. या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी हत्येचं गूढ उलगडलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी केली असता, आरोपीनं मृताच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Dhule, Love, Murder

    पुढील बातम्या