मराठी बातम्या /बातम्या /nashik /Shiv Sena vs NCP: भाजीपाला विकणारे Bhujbal 25 वर्षांत 25 हजार कोटींचे मालक कसे झाले? आमदार Suhas Kande यांचा सवाल

Shiv Sena vs NCP: भाजीपाला विकणारे Bhujbal 25 वर्षांत 25 हजार कोटींचे मालक कसे झाले? आमदार Suhas Kande यांचा सवाल

'भुजबळांविरोधात माझ्याकडे 500 पुरावे' शिवसेना आमदाराची हायकोर्टात धाव  (फाईल फोटो)

'भुजबळांविरोधात माझ्याकडे 500 पुरावे' शिवसेना आमदाराची हायकोर्टात धाव (फाईल फोटो)

Chhagan Bhujbal vs Shiv Sena MLA Suhas Kande: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यातील संघर्ष विकोपाला गेल्याचं दिसत आहे.

नाशिक, 30 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि शिवसेना आमदार सुहास कांदे (Shiv Sena MLA Suhas Kande) यांच्यातील वाद आता आणखी चिघळल्याचं दिसत आहे. आमदार सुहास कांदे यांनी आज पत्रकार परिषद घेत थेट छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. या पत्रकार परिषदेत आमदार सुहास कांदे यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, शिवसेना नेते अजय बोरस्ते, शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे सुद्धा उपस्थित होते.

निधी वाटपाचा अधिकार भुजबळांना नाहीच

आमदार सुहास कांदे यांनी म्हटलं, छगन भुजबळ आणि माझा वाद हे महाविकास आघाडीचं भांडण नाही. 12 कोटी निधी आला यातील 10 कोटी ठेकेदारांना भुजबळांनी वाटले. माझ्या मतदारसंघात फक्त 2 कोटी दिले. भुजबळांना नियोजन निधी वाटपाचा अधिकारच नाही. अधिकार नसतांना छगन भुजबळ यांनी वाटप करून गैरव्यवहार केला. त्यांचं पालकमंत्रिपद काढावं ही मागणी आहे.

25 वर्षांत 25 हजार कोटींचे मालक कसे?

छगन भुजबळ यांनी भ्रष्टाचार केला आहे. माझ्याजवळ त्याचे पुरावे आहेत. हे पुरावे मुख्यमंत्र्यांना आणि अजित पवारांना सादर केले आहेत. मी त्यांच्यासोबत कधीही चर्चेला येण्यासाठी तयार आहे. भाजीपाला विकणारे भुजबळ,25 वर्षात 25 हजार कोटींचे मालक कसे झाले ? असा सवालही यावेळी सुहास कांदे यांनी उपस्थित केला.

भुजबळ हे भाई युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी नाही तर प्राचार्य

आमदार सुहास कांदे यांनी पोलिसांना पत्र लिहून धमकीचा फोन आल्याचं म्हटलं होतं. छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं, माझ्यावर खोटे आरोप करुन बदनाम करण्याचा डाव आहे. मी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणीही केली आहे. मी कधीही भाई युनिव्हर्सिटीमध्ये गेलेलो नाही. त्यानंतर आता भुजबळांना सुहास कांदे यांनी प्रत्युत्तर देत म्हटलं, छगन भुजबळ हे भाई युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी नाही तर प्राचार्य आहेत.

सुहास कांदेंना धमकीचा फोन?

सुहास कांदे यांनी काही दिवसांपूर्वी पोलिसांकडे पत्र लिहून तक्रार दिली आहे. या तक्रारीमध्ये अंडरवर्ल्डमधून धमकी आल्याचा दावा कांदे यांनी केला आहे. छोटा राजनच्या पुतण्याने फोनकरून धमकी दिल्याचा दावा कांदेंनी केला होता. 27 तारखेला संध्याकाळी सुहास कांदे यांना अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा पुतण्या अक्षय निकाळजे याने फोन केला होता. उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे अन्यथा तुझ्या कुटुंबाचे चांगले होणार नाही, अशी धमकी फोनवर दिली असल्याचं सुहास कांदे म्हणाले होते.

भुजबळ यांच्या विरोधात आमदार सुहास कांदेंची हायकोर्टात धाव

शिवसेना आमदार सुहास कांदे यांची भुजबळांच्या विरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. नियोजन समितीचा निधी भुजबळांनी विकल्याचा आमदार सुहास कांदे यांचा आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी सुहास कांदे यांनी थेट न्यायालयातच धाव घेतली आहे. या याचिकेत जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी देखील प्रतिवादी आहेत. भुजबळांनी निधी विकल्याचे पाचशे पुरावे असल्याचा आमदार सुहास कांदे यांचा दावा आहे.

11 सप्टेंबर रोजी छगन भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात एका बैठकीत जोरदार खडाजंगी झाली होती. नाशिकचे पालकमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा नांदगावचा अतिवृष्टी दौरा वादळी ठरला होता. तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत शिवसेनेचे आमदार आणि भुजबळ यांच्यात जोरदार खडाजंगी पाहण्यास मिळाली. यामुळे काही काळ सभागृहात तणावाचे वातावरण पाहण्यास मिळाले होते.

First published:

Tags: Chagan bhujbal, Nashik, Shiv sena