Home /News /nashik /

Coronavirus in Nashik: नाशकातील 'या' 3 तालुक्यांत पुन्हा कठोर निर्बंध?

Coronavirus in Nashik: नाशकातील 'या' 3 तालुक्यांत पुन्हा कठोर निर्बंध?

नाशकातील 'या' 3 तालुक्यांत पुन्हा कठोर निर्बंध? (File Photo)

नाशकातील 'या' 3 तालुक्यांत पुन्हा कठोर निर्बंध? (File Photo)

Chhagan Bhujbal on Coronavirus situation in Nashik: नाशिकमधील काही भागांत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देताना कठोर निर्बंध लावण्याचे संकेत दिले आहेत.

    नाशिक, 8 ऑक्टोबर : राज्यातील कोरोनाची (Coronavirus) रुग्णसंख्या कमी होत असल्याने शाळा सुरू करण्यात आल्या असून मंदिरे खुली (Temples reopen) करण्यात आली आहेत. मात्र, त्याच दरम्यान अहमदनगर (Ahmednagar) आणि नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक (coronavirus spike in Nashik district) होत असल्याचं दिसून येत आहे. अहमदनगरमधील 60 हून अधिक गावांत लॉकडाऊन लावण्यात आला असताना आता नाशकातून चिंता वाढवणारी बातमी आली आहे. नाशिकमधील तीन तालुक्यांत कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. जर या तालुक्यांत कोरोना बाधितांच्या संख्येत अशीच वाढ सुरू राहिली तर कठोर निर्बंध लावण्याचे संकेत पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिले आहेत. या तीन तालुक्यांनी वाढवली चिंता नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, निफाड, सिन्नर आणि येवला तालुक्यात कोरोना बाधिताांची संख्या वाढली असून चिंता वाढवणारी आकडेवारी आहे. काही ठिकाणचे मार्केट्स सुद्धा आपल्याला बंद करावे लागतील. तशी परिस्थिती येऊ नये यासाठी या तिन्ही तालुक्यांत विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. या तालुक्ंयातील कोरोना पॉझिटिव्हिटी दर जर कमी झाला नाही तर कठोर निर्बंध लावावे लागतील. वाचा : Corona परतीचं Countdown सुरू! WHO कडून कोरोनाबाबत दिलासादायक वृत्त निर्बंध शिथिल झाल्याने इतर जिल्ह्यांतून येणाऱ्या-जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शेजारील जिल्ह्यातील 68 गावे लॉकडाऊन केले आहेत. तिथल्या नागरिकांचे येणं-जाणं किंवा तेथील रुग्णालयात आपल्या नागरिकांनी जाणं किंवा इतर कामासाठी जाणं यातूनही निश्चित परिणाम होत असल्याचं दिसत आहे असंही छगन भुजबळांनी म्हटलं आहे. नगर जिल्ह्यात 60 हून घावांत लॉकडाऊन राज्यातील कोरोना कमी होत असताना अहमदनगर जिल्ह्यामध्ये मात्र करुणा रुग्णांची संख्या कमी होत नाहीये. वाढत असलेल्या कोरोनाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अहमदनगर जिल्ह्यातील 60 गावांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. एका नवीन कोरोना रुग्णाच्या संपर्कातील तीस जणांची चाचणी केली जात असून आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. वाचा : फक्त 100 रुपयांत कोरोना टेस्ट; घरबसल्या अवघ्या 20 सेकंदात मिळणार रिपोर्ट राज्यातील मंदिरे उघडण्याचे आदेश शासनाने दिले असले तरी अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सहा प्रमुख ठिकाणी नवरात्र उत्सवाला करण्यास मनाई केली आहे. या ठिकाणी 144 कलम लागू केला आहे. या ठिकाणी दिवसाच्या दर्शनासाठी प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी दररोज पाच हजार भाविक दर्शन घेण्याची पासेसची व्यवस्था प्रशासनाने केले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी लागू केलेले हे आदेश 20 ऑक्टोबरपर्यंत कायम असणार आहेत. अहमदनगरमधील या धार्मिक स्थळाप्रार्थना स्थळाचे ठिकाण 144 कलाम लागू 1. श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट मोहटे, ता.पाथर्डी (मोहटा देवी मंदीर) 2. श्री जगदंबा देवी मंदीर, राशीन, ता.कर्जत 3. रेणूका माता देवी मंदीर, केडगांव ता.अहमदनगर 4 रेणूका माता देवी मंदीर, एम.आय.डी.सी., अहमदनगर
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Ahmednagar, Chagan bhujbal, Coronavirus, Nashik

    पुढील बातम्या