• Home
  • »
  • News
  • »
  • coronavirus-latest-news
  • »
  • फक्त 100 रुपयांत कोरोना टेस्ट; घरबसल्या अवघ्या 20 सेकंदात मिळणार रिपोर्ट

फक्त 100 रुपयांत कोरोना टेस्ट; घरबसल्या अवघ्या 20 सेकंदात मिळणार रिपोर्ट

अगदी कमी वेळेत, कमी खर्चात कोरोना टेस्टचा रिपोर्ट तुमच्या हातात.

  • Share this:
लखनऊ, 06 ऑक्टोबर : सध्या एका शहरातून दुसरीकडे जाण्यासाठी किंवा अन्य अनेक गोष्टींसाठी कोरोना चाचणी (Corona test) अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे. हा अहवाल येण्यासाठी कमीत कमी एका दिवसाचा कालावधी तरी आवश्यक असतोच. तसंच खासगी ठिकाणी कोरोना चाचणी (Corona test report) करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्चही येतो. यावर पर्याय म्हणून उत्तर प्रदेशमधील प्रयागराजच्या मोतीलाल नेहरू नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील (MNIT) वैज्ञानिकांनी एक नवा पर्याय समोर आणला आहे. एमएनआयटीचे वैज्ञानिक आता एक असं मशीन (MNIT covid test machine) तयार करत आहेत, की ज्याच्या मदतीने तुम्ही घरबसल्या अवघ्या 20 सेकंदांमध्ये कोविड चाचणी (Covid test in 20 seconds) अहवाल मिळवू शकता. तसंच, यासाठी तुम्हाला केवळ 100 रुपये खर्च (Covid test in 100 rupees) करण्याची गरज भासणार आहे. हे वाचा - SANITIZERS चा खप आला निम्म्यावर, Corona कमी होतोय की त्याची दहशत? हे एक हाय टेक फोल्डिंग पोर्टेबल (High tech portable covid test machine) मशीन असेल, ज्यामध्ये डीप एक्स डिव्हाइस (Deep X device) असेल. डीप एक्स डिव्हाइसचं सॉफ्टवेअर एका पोर्टेबल एक्सरे स्कॅनरशी (Portable scanner) जोडलेलं असेल. हा पोर्टेबल स्कॅनर एखाद्या व्यक्तीच्या फुफ्फुसांना स्कॅन (Scan lungs tpo detect covid) करेल. यातून मिळणारा डेटा सॉफ्टवेअरला शेअर केला जाईल. याद्वारे त्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे की नाही याबाबत माहिती मिळू शकेल. विशेष म्हणजे, ही सगळी प्रक्रिया करण्यासाठी या मशीनला अवघ्या 20 सेकंदांचा कालावधी लागेल. स्कॅनिंग पूर्ण झाल्यानंतर, तातडीने तुम्हाला कोरोना अहवाल (Corona report in 20 seconds) मिळून जाईल. हे मशीन एका छोट्या सूटकेसमधून कुठेही घेऊन जाता येईल एवढं लहान असेल. तसंच, या मशीनच्या मदतीने एका चाचणीसाठी केवळ 100 रुपये खर्च येणार आहे. हे वाचा - भयावह ठरू शकते कोरोनाची तिसरी लाट; या गोष्टी ठरतील कारणीभूत, तज्ज्ञांचा इशारा या मशीनची निर्मिती एमएनआयटीमधील (MNIT team) पाच सदस्यीय पथकाकडून केली जात आहे. यामध्ये मेकॅनिकल ब्रांचचे प्रा. मुकुल शुक्ला आणि डॉ. प्रवीण अग्रवाल, कम्प्युटर सायन्स विभागातले डॉ. सजिता आणि डॉ. नवजोत सिंह, तसंच, रेडिऑलॉजिस्ट डॉ. दीपक गुप्ता यांचा समावेश आहे. हे मशीन तयार झाल्यानंतर कोरोनाविरुद्धच्या लढाईत अगदीच फायद्याचं ठरणार आहे. यासाठी डीएसटीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने एमएनआयटीच्या मेकॅनिकल शाखेला 52 लाख रुपयांची ग्रांटही मंजूर केली आहे. त्यामुळे ही क्रांतिकारी मशीन तयार करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे, असं वृत्त आज तकने दिलं आहे.
First published: