जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / Corona परतीचं Countdown सुरू! WHO कडून कोरोनाबाबत दिलासादायक वृत्त

Corona परतीचं Countdown सुरू! WHO कडून कोरोनाबाबत दिलासादायक वृत्त

file photo

file photo

जागतिक आरोग्य संघटनेकडून सर्वांसाठी चांगले वृत्त समोर आले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

जेनेवा, 6 ऑक्टोबर : तब्बल दोन वर्षांपासून जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरस संसर्गाचा वेग (Coronavirus) मंदावल्यामुळे दिलासादायक संकेत मिळाले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं की, (WHO) कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत गेल्या आठवड्यात घट (The number of new patients in Corona dropped last week) पाहायला मिळत आहे. वैश्विस स्तरावर पाहिलं तर रुग्णसंख्येतील घट ऑगस्टमध्ये सुरू झालं होतं, जे अद्यापही सुरू आहे. त्यामुळे कोरोनाचं सावट काही प्रमाणात तरी टळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Corona return countdown begins good news about Corona from WHO ) युरोपमधील परिस्थितीत अद्याप सुधार नाही महासाथीच्या आकलनात, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सांगितलं की, गेल्या आठवड्यात Covid-19 चे 31 लाख नवीन रुग्ण होते. ज्यात 9 टक्क्यांची घट दाखल करण्यात आली आहे. आणि तब्बल 54,000 मृत्यूंची नोंद झाली आहे. WHO ने सांगितलं की, सांगितलं की, युरोपव्यतिरिक्त जगातील सर्व भागांमध्ये रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. हे ही वाचा- मित्राला लसीकरणासाठी तयार करा आणि मिळवा मोफत जेवण किंवा सिनेमा कोविड-19 प्रकरणात आफ्रिकेत तब्बल 43 टक्के, पश्चिम आशिया आणि दक्षिण पूर्व आशिया दोघांत तब्बल 20 टक्के, अमेरिका आणि पश्चिमी प्रशांत भागात 13 टक्क्यांची घट पाहायला मिळत आहे. महासाथीत मृत्यूच्या संख्येत सर्वाधिक घट आफ्रिकामध्ये पाहायला मिळत आहे. बुस्टर डोस देण्याचं केलं अपील WHO ने सांगितलं की, तब्बल एक तृतीयांश आफ्रिकी देश सप्टेंबरच्या शेवटपर्यंत कमीत कमी देशातील 10 टक्के लोकसंख्येला कोरोनाची लस देण्यात यशस्वी ठरले. WHO चे प्रमुख वारंवार श्रीमंत देशांना वर्षाच्या शेवटपर्यंत बूस्टर डोज (Booster Dose) देण्याची अपील करीत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात