नाशिक, 26 सप्टेंबर : नाशिकमध्ये धर्मांतराचं रॅकेट (Religion conversion racket) चालवणाऱ्या एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश एटीएस (up ats) पथकाने धडक कारवाई करत नाशिक रोड (nashik road) परिसरातून या तरुणाला अटक केली आहे. उत्तर प्रदेशच्या धर्मांतर प्रकरणात या तरुणाचा समावेश असल्याचा ATS ला संशय आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये आज ATS ने नाशिक रोड परिसरात ही कारवाई केली आहे. धर्मांतराचा रॅकेट चालवणार्याला एटीएसने अटक केली आहे. आतिफ उर्फ कुणाल असं या तरुणाचं नाव आहे. नाशिक रोडच्या आनंद नगर भागात हा तरुण कुणाल म्हणून वास्तव्याला होता.
काँग्रेसमध्ये बढती मिळताच नेत्याने घरीच भरवली भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक
आतिफच्या खात्यात परदेशातून वेगवेगळ्या खात्यांमधून तब्बल 20 कोटी रुपये जमा झाले आहे. याची तपासणी केली असता पैसे कुठून आले याचा तपशील आरोपी उपलब्ध नाही. ATS या बाबत अधिक तपास करत आहे. उत्तर प्रदेशच्या धर्मांतर प्रकरणात अतिफचा समावेश असल्याचा संशय ATS ला आहे. या कारवाईमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
आतिफ हा हा नाशिक रोडला डॉक्टर प्रॅक्टिस करत होता. त्याने रशियातून मेडिकलचं शिक्षण घेतलं. नाशिक रोड परिसरात इस्लामिक दवाई सेंटर चालवत होती. या ठिकाणी तो रुग्णांना, धर्मपरिवर्तनासाठी प्रवृत्त करायचा. उत्तर प्रदेशातील मौलाना कलीम सिद्दीकी याच्या तपासणीतून अतिफ उर्फ कुणालची माहिती UP ATS ला समजली. त्यानंतरही ही कारवाई करण्यात आली.
बीडच्या तरुणाला उत्तरप्रदेशमध्ये अटक
याआधीही जून महिन्यात बीड जिल्ह्यातील इरफान पठाण (Irfan Pathan) नावाच्या तरुणाला उत्तरप्रदेशमध्ये (Uttar Pradesh) अटक करण्यात आली होती. इरफान बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणात उत्तरप्रदेश पोलिसांनी एकूण तिघांना अटक केली आणि त्यात इरफानचा समावेश होता.
इरफान खान हा मूळचा बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील शिरसाळा येथील रहिवासी आहे, तो सध्या दिल्लीत वास्तव्यास आहे. दिल्लीतील मिनिस्ट्री ऑफ चाइल्ड वेल्फेअरमध्ये इंटरप्रीटेटर म्हणून काम करतो. मात्र इरफानला अवैध धर्मांतर प्रकरणांमध्ये यूपी एटीएसने ताब्यात घेतलं. शिरसाळ यातच त्याचं प्राथमिक शिक्षण झालं. सध्या तो प्रोफेसर असून दिल्लीत वास्तव्यास आहे, असं त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आलंय. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.