नागपूर, 26 सप्टेंबर : अलीकडे काँग्रेसने (congress) राज्यातील कार्यकारणी जाहीर केली आहे. अनेक नेत्यांना नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सर्व नेते कामाला लागले असताना काँग्रेस नेते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीवर आताच नियुक्त झालेले माजी आमदार आशिष देशमुख (ashish deshmukh) यांनी चक्क भाजप (bjp) उमेदवाराचा प्रचाराला हजर झाल्यामुळे एकच खळबळ उडवून दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 25 सप्टेंबर रोजी आशिष देशमुख यांनी सावरगाव जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपा उमेदवार पार्वता काळबांडे यांच्या प्रचारार्थ सावरगाव येथील त्यांच्या निवासस्थानी स्थानिक भाजप नेत्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला भाजपचे स्थानिक पदाधिकारी हजर होते. देशमुख यांनी आपल्याच निवास्थानी ही बैठक बोलावली होती. या बैठकीचे फोटो आता व्हायरल झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक काँग्रेस नेते त्यांच्या या भूमिकेमुळे वैतागले आहे. भारताला हिंदूराष्ट्र घोषित करा, अन्यथा 2 तारखेला जलसमाधी; संत परमहंसांची घोषणा विशेष म्हणजे, आशिष देशमुख यांची एक महिण्याआधीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे आशिष देशमुख यांचे काँग्रेसमध्ये मन रमत नसल्याची सद्या जिल्ह्यात चर्चा आहे. ग्लेन मॅक्सवेल, विराटची शानदार अर्धशतके; मुंबई इंडियन्ससमोर 166 धावांचे आव्हान काही दिवसा आधीच आशिष देशमुख यांनी त्यांच्याच पक्षाचे क्रीडामंत्री सुनील केदार यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांच्यावर बँकेत गैरव्यवहार झाल्याचे आरोपही केले होते. या आरोपानंतर काँग्रेसकडून मनधरणी करत त्यांना काँग्रेस कमिटीवर घेण्यात आले आहे. त्यानंतर आता देशमुख यांनी भाजप नेत्यांची बैठक घेऊन एकच धुरळा उडवून दिला आहे. त्यामुळे आशिष देशमुख नेमके कोणत्या राजकीय पक्षात आहे हा प्रश्न सर्वांना पडला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.