जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / सिनेमात काम देतो म्हणून भरत जाधव यांच्या नावावर सुरू होता 'हा' धक्कादायक प्रकार

सिनेमात काम देतो म्हणून भरत जाधव यांच्या नावावर सुरू होता 'हा' धक्कादायक प्रकार

सिनेमात काम देतो म्हणून भरत जाधव यांच्या नावावर सुरू होता 'हा' धक्कादायक प्रकार

अभिनेता भरत जाधव (Bharat Jadhav) यांच्या नावाखाली पैसे मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अभिनेते भरत जाधव यांनी इन्स्टा पोस्ट करत घडलेल्या सर्व प्रकारबद्दल माहिती दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 26 सप्टेंबर : अभिनेते भरत जाधव  (Bharat Jadhav) यांच्या  नावाखाली पैसे मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अभिनेते भरत जाधव यांनी इन्स्टा पोस्ट (Bharat Jadhav Latest  Instagram Post) करत घडलेल्या सर्व प्रकारबद्दल माहिती दिली आहे.  न्यूज पेपर तसेत टीव्हीवर देखील आपण काही फसवणुकीच्या बातम्या वाचत असतो.  असाच काहीसा प्रकार भरत जाधव **(Bharat Jadhav Latest News)**यांच्यासोबत घडला आहे. भरत यांच्या सिनेमात काम मिळवून देऊन फोटोशुटसाठी जवळपास 15000 हजार रुपयांची मागणी केली गेली आहे. भरत जाधव यांनी इन्स्टावर पोस्ट करत घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती दिली आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, काल एका व्यक्ती चा मेसेज आला की “तुमच्या सिनेमात काम करण्यासाठी मुंबईतील एका एजंटने आमची ऑडिशन घेतली व सिलेक्शन झाले असून फोटोशूट व पुढील प्रोसेसिंग फी च्या नावाखाली १५०००/- रुपयांची मागणी केली. वाचा : Bigg Boss Marathi 3 मधील ‘या’ स्पर्धकाने आतापर्यंत 4 वेळा खाल्ली आहे तुरुंगाची हवा “मी सर्वांना सांगू इच्छितो की माझ्या कोणत्याही सिनेमाचं असं कुठेही ऑडिशन सुरू नाहीए. जर कोणी माझ्या नावाचा गैरवापर करून किंवा माझ्या सोबतचा एखादा फोटो दाखवून सिनेमात काम मिळवून देतो असे आश्वासन देत असेल तर अशा भूलथापांना बळी पडू नका. कोणालाही पैसे देऊ नका. संबंधित व्यक्तींवर लवकरच योग्य ती कायदेशीर कारवाई होईल, अशी पोस्ट करत भरत जाधव यांनी सर्वांना जागरूक करण्याचा प्रकार  घडला आहे.

जाहिरात

सध्या फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. सिनेमात काम देतो म्हणून मोठ्या कलाकारांचा नावाचा वापर करून लोकांना फसवले जाण्याचे अनेक प्रकार उगडकीस आले आहेत.  पोलीस असतील किंला कायदा व्यवस्था वारंवार अशा फसवणुकीच्या प्रकाराला बळी पडू नये म्हणून जागरूक करत असतात. नागरिकांने अशा काळात जागरूक राहणे गरजेचे आहे. भरत जाधव यांनी देखील हा प्रकार उघडकीस आणून लोकांना जागरूक केले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात