नाशिक, 07 ऑगस्ट: नाशिकमध्ये (Nashik) डेल्टा व्हेरिएंटने शिरकाव केला आहे. एकाच वेळी 30 जणांना लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. नाशिक जिल्ह्यात डेल्टा व्हेरियंटने (Delta Variant) शिरकाव केल्यामुळे खळबळ उडाली आहे. एकाच वेळी 30 जणांना लागण झाल्याचं समोर आले आहे. एकूण 155 सॅपल्स तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी 30 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. यावर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पाच टक्के नमुने तपासणीसाठी पुण्यातील लॅबला पाठवले जातात. यातील 30 रुग्णांना डेल्टा व्हेरियंटची लागण झाली. मात्र सर्व रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती छगन भुजबळ यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
पुढे भुजबळ यांनी सांगितलं की, सध्या जिल्ह्यात 1076 कोरोना रुग्ण असून 1.9 पॉझिटिव्हीटी रेट आहेत. जिल्ह्यात 139 ऑक्सिजन स्टेशन आहेत. तर 2.12 मृत्यूदर असून 55 म्युकरमायकोसीस रुग्ण आहेत. जिल्ह्यात 19 लाख 80 हजार आतापर्यंत लसीकरण झाल्याचंही त्यांनी सांगितलं. मास्क, social distancing बंधनं नागरिकांनी कठोरपणे पाळावे, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
...अन् लग्न मंडपात नवरदेवाला कोसळलं रडू; VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं
नाशिकमध्ये Delta Variant चे 30 रुग्ण आढळले
नाशिक जिल्ह्यात डेल्टा व्हेरियंटने शिरकाव केल्यामुळे खळबळ उडाली आहे. एकाच वेळी 30 जणांना लागण झाल्याचं समोर आले आहे. एकूण 155 सॅपल्स तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी 30 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. तर जिल्ह्यातील नांदगाव, सिन्नर, येवला, कळवण या तालुक्यातील गावात 28 जणांना लागण झाली आहे. तर नाशिक शहरात 2 रुग्ण आढळले आहे. सर्व रुग्ण हे आरोग्य यंत्रणांच्या निगराणीखाली आहे.
नवरा-नवरीचं लग्नात हे चाललंय तरी काय? VIDEO पाहून व्हाल हैराण
दरम्यान, जून महिन्यापर्यंत राज्यात डेल्टा प्लसचे एकूण 21 रुग्ण असून डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळून आले होते. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला होतो. त्यानंतर राज्य सरकारने 36 जिल्ह्यांतून सॅम्पल तपासणीसाठी पाठवले होते आणि डेल्टा प्लसच्या रुग्णांसाठी आवश्यक ती काळजी घेतली जात होती. अखेरीस राज्य सरकारच्या या लढ्याला जुलै महिन्यात यश आले होते. 14 जुलैला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी 'राज्यात कुठे ही डेल्टा प्लसचा नवा रुग्ण राज्यात आढळलेला नाही. प्रत्येक जिल्ह्यांतून 100 नमुने तपासणी सुरू आहे. मागील महिन्यात 21 रुग्ण आढळले होते. पण आता नवीन रुग्ण आढळले नाही' असं जाहीर सुद्धा केलं होतं. पण, आता नाशिकमध्ये डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chagan bhujbal, Nashik