मुंबई, 07 ऑगस्ट : कोरोना काळात अनेक जण अगदी मोजक्याच लोकांमध्ये लग्न (Wedding Video) आटोपून घेत आहेत. अशाच एका लॉकडाऊनमधील लग्नाचा (Lockdown Wedding Video) व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होत आहे. ज्यात लग्नाचे विधी आटोपल्यानंतर नवरा-नवरी चक्क लग्न मंडपातच खेळताना दिसले आहे (Bride and groom playing). लग्न म्हटलं की मजामस्ती, गाणी-डान्सची धमाल असते. पण जर लग्नात माणसंच नसतील तर मग ते लग्न बोअरिंग. आपल्या अशाच बोअरिंग लग्नात या नवरा-नवरीने जुगाड शोधून काढला. ते एकमेकांसोबत खेळू लागले.
व्हिडीओत पाहू शकता नवरा-नवरी एकमेकांसोबत बसले आहेत. दोघांनीही एकमेकांचा हात हातात धरला आहे. नवरीच्या बोटात एक अंगठी आणि अंगठीसोबतच हे दोघं खेळत आहे. हे वाचा - VIDEO: रिमझिम पावसात रस्त्यात वरवधूचा रोमान्स; दोघांनी डोक्यावर शेला धरला आणि… नवरीच्या बोटात असलेली ही अंगठी स्पिनर रिंग आहे (Spinner Ring). witty_wedding इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार नवरीने लग्नाच्या एक दिवस आधीच ही रिंग कुठूनतरी मिळवली होती. लग्नात या रिंगचा तिला खूपच फायदा झाल्याचा दिसतो आहे. नवऱ्यासोबत ती खेळता खेळता रोमँटिक क्षणही अनुभवताना दिसत आहे. स्पिनर रिंग फिरवता फिरवता दोघंही एकमेकांसोबत गप्पा मारत आहेत. त्याचवेळी नवरा नवरीच्या डोक्यावर चुंबनही घेताना दिसतो आहे. हे वाचा - VIDEO - नवरदेवाच्या मित्राने दिलं असं गिफ्ट; पाहताच लाजेनं गुलाबी झाली नवरी लग्नात असे काही छोटेछोटे मजेशीर खेळ असतात. पण मोजक्याच लोकांमध्ये लग्न आटोपल्याने या नवरा-नवरीला काही त्या खेळांचा आनंद घेता आला नाही. पण त्यांनी आपल्यासाठी या स्पेशल खेळाची मात्र तयारी करून ठेवली होती.