जाहिरात
मराठी बातम्या / Viral / ...अन् लग्न मंडपात नवरदेवाला कोसळलं रडू; VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं

...अन् लग्न मंडपात नवरदेवाला कोसळलं रडू; VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं

लग्नात नवरदेव झाला भावुक

लग्नात नवरदेव झाला भावुक

या नवरदेवाच्या रडण्याचं नेमकं कारण काय हे तर तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यावरच समजेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 07 ऑगस्ट : लग्नात (Wedding video) नवरींना तुम्ही रडताना (Bride crying) पाहिलं असेल. पण नवरदेव… (Groom crying) त्याला कधी रडताना पाहिलं आहे का? सध्या अशाच एका नवरदेवाचा (Groom video) व्हिडीओ व्हायरल (Viral video) होतो आहे. ज्याला भरमंडपात रडू कोसळलं. आता नवरी (Bride video) रडण्यामागे एक कारण असतं ते  ती माहेर सोडून सासरी जात असते. पण नवरदेव तो का रडू लागला (Groom crying after varmala), असा प्रश्न पडणं साहजिकच आहे. आता या नवरदेवाच्या रडण्याचं नेमकं कारण काय हे तर तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यावरच समजेल. लग्नात मजामस्तीप्रमाणे काही भावुक क्षणही असतात. अशाच एका भावुक क्षणाचा हा व्हिडीओ आहे, ज्यात नवरदेव रडताना दिसला.

जाहिरात

व्हिडीओत पाहू शकता, सुरुवातील लग्नात नवरा-नवरी एकमेकांना वरमाला घालत आहेत. सुरुवातीला नवरी नवरदेवाला वरमाला घालते. तेव्हा नवरा आपल्या गुडघ्यावर खाली बसतो. त्यानंतर नवरा नवरीला वरमाला घालताना नवरीसुद्धा तसंच करते. दोघंही एकमेकांना वरमाला घालतात त्यानंतर नवऱ्याला रडू कोसळतं. हे वाचा -  VIDEO: रिमझिम पावसात रस्त्यात वरवधूचा रोमान्स; दोघांनी डोक्यावर शेला धरला आणि… नवरा आपल्या डोळ्यातून बाहेर आलेले अश्रू पुसताना दिसतो. त्याला रडताना पाहून नवरीलाही रडू आवरत नाही. आपल्या नवऱ्याला रडताना पाहून ती त्याला सावरण्याचा प्रयत्न करते. पण त्याच वेळी तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात. नवरा-नवरी दोघंही रडताना दिसतात. आता व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला समजलंच असेल हे नवरा-नवरीचे हे अश्रू म्हणजे आनंदाश्रू आहेत. दोघांनीही एकमेकांसोबत आयुष्य जगण्याची स्वप्नं रंगवली आणि त्यांचं हे स्वप्नं प्रत्यक्षात साकारत आहेत. दोघंही एकमेकांच्या आयुष्याचे जोडीदार झाले आहेत. हे स्वप्नं साकारत असताना त्यांना विश्वास बसत नाही आहे आणि ते दोघंही इमोशनल झाले. त्यांच्या या भावना अश्रूतून दिसून आल्या. हे वाचा -  VIDEO - नवरदेवाच्या मित्राने दिलं असं गिफ्ट; पाहताच लाजेनं गुलाबी झाली नवरी witty_wedding या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ नेटिझन्सना खूपच आवडत आहेत. या वधूवराचं प्रेम पाहून नेटिझन्सही इमोशन झाले आहेत. यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात