Nashik Oxygen leak: नाशिकमध्ये हाहाकार; मृतकांचा आकडा आणखी वाढला

Nashik Oxygen leak: नाशिकमध्ये हाहाकार; मृतकांचा आकडा आणखी वाढला

नाशिकमध्ये पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक (Nashik Oxygen Leak) झाल्याची घटना घडली आहे. यादरम्यान 25 रुग्ण दगावल्याची माहिती समोर आली आहे.

  • Share this:

नाशिक 21 एप्रिल : नाशिकमध्ये पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक (Nashik Oxygen Leak) झाल्याची घटना घडली आहे. यात गॅस सर्वत्र पसरल्यानं एकच गोंधळ उडाला. याशिवाय रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांपैकी 171 जण ऑक्सिजनवर आहेत. तर, व्हेंटिलेटरवर आणी अत्यवस्थ 67 रुग्ण आहेत. टँक लीक झाल्यानंतर तब्बल अर्धा तास ऑक्सिजन पुरवठा विस्कळीत झाला होता. यादरम्यान 25 रुग्ण दगावल्याची माहिती समोर आली आहे. लीक झालेला ऑक्सिजन टँक 20 KL क्षमतेचा होता.

Nashik Oxygen Leak: नाशकात ऑक्सिजन गळती; प्राणवायूअभावी 11 जणांचा मृत्यू- टोपे

याबाबत बोलताना पालिका आयुक्तांनी सांगितलं होतं, की झाकीर हुसेन रुग्णालयात 150 रुग्ण होते. यातील 23 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. याप्रकरणाची उच्चस्तरिय चौकशी केली जाईल, असंही आयुक्तांनी सांगितलं. व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालेलं चालत नाही. त्यामुळे, या घटनेत 10 ते 12 रुग्ण दगावल्याची प्राथमिक माहिती मिळाली असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, आता याप्रकरणाबाबतची अधिक माहिती समोर आली असून यात आतापर्यंत 25 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

VIDEO: नाशिक पालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक, काही रुग्ण दगावल्याची माहिती

याप्रकरणाबाबत बोलताना सुरुवातीला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ऑक्सिजनची किरकोळ गळती झाली असून कोणाचाही मृत्यू झालं नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, नंतर त्यांनीही या घटनेत अकरा रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. मात्र, या आकड्यामध्ये आता वाढ होत असल्याचं चित्र आहे. याप्रकरणाची उच्चस्तरिय चौकशी केली जाणार आहे.

Published by: Kiran Pharate
First published: April 21, 2021, 1:22 PM IST

ताज्या बातम्या