VIDEO: नाशिक पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक, काही रुग्ण दगावल्याची प्राथमिक माहिती

VIDEO: नाशिक पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक, काही रुग्ण दगावल्याची प्राथमिक माहिती

नाशिक पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक (Oxygen Tank Leak) झाल्याची घटना घडली आहे. टँक लीक झाल्यानं सर्वत्र गॅस पसरल्याचं चित्र आहे.

  • Share this:

नाशिक 21 एप्रिल: नाशिक पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक (Oxygen Tank Leak) झाल्याची घटना घडली आहे. यानंतर रुग्णालयाच्या परिसरात एकच हाहाकार झाला आहे. ऑक्सिजन टँक लीक झाल्यानं सर्वत्र गॅस पसरल्याचं चित्र आहे. यानंतर ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा तासाठी खंडीत झाला. 20 KL क्षमतेची ऑक्सिजन टाकी लीक झाल्यानं परिसरात एकच गोंधळ उडाला. पालिकेच्या या रुग्णालयात 171 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तर, 67 रुग्णं व्हेंटिलेटर आणि अत्यवस्थ आहेत. या घटनेमध्ये काही रुग्ण दगावल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

बातमी अपडेट होत आहे.

Published by: Kiran Pharate
First published: April 21, 2021, 12:54 PM IST

ताज्या बातम्या