Nashik Oxygen Leak : नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती; प्राणवायूअभावी 11 जणांचा मृत्यू- राजेश टोपे

Nashik Oxygen Leak : नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती; प्राणवायूअभावी 11 जणांचा मृत्यू- राजेश टोपे

आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope on Nashik Oxygen Leak) यांनी नाशिकमधील गॅस गळतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे

  • Share this:

नाशिक 21 एप्रिल : नाशिक पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक झाल्याची घटना घडली आहे. ही घटना इतकी भयंकर होती अर्धा तास ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला होता. या घटनेमध्ये 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ऑक्सिजन वेळेत न मिळाल्याने व्हेंटिलेटरवर असणाऱ्या 11 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. स्थानिक प्रशासनानं याबद्दलची माहिती दिल्याचं टोपे यांनी सांगितलं. याठिकाणी एकूण 23 रुग्ण व्हेंटिलेटवर होते असल्याची माहिती समोर आली आहे.

VIDEO: नाशिक पालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक, काही रुग्ण दगावल्याची माहिती

याबाबत बोलताना पालिका आयुक्तांनी सांगितलं, की झाकीर हुसेन रुग्णालयात 150 रुग्ण होते. यातील 23 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. याप्रकरणाची उच्चस्तरिय चौकशी केली जाईल, असंही आयुक्तांनी सांगितलं. व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांना ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालेलं चालत नाही. त्यामुळे, या घटनेत 10 ते 12 रुग्ण दगावल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

राजेश टोपे यांनी यावेळी लसीच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत, यावरही प्रतिक्रिया दिली. टोपे म्हणाले, कोरोना लसीचा दर कमी करण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे. इतर देशांमधील कोरोना लसींचे दर खूप जास्त असून भारतातील दोन्ही कंपन्यांच्या लसीचे दर कमी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Nashik Oxygen Leak: ऑक्सिजन पुरवठा अर्धा तास खंडित, काही रुग्ण दगावल्याची माहिती

लॉकडाऊनवर प्रतिक्रिया -

टोपे म्हणाले, पंतप्रधानांनी शेवटचा पर्याय लॉकडाऊन असल्याचं सांगितलं. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं. टोपे म्हणाले, की अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सगळं बंद राहणं गरजेचं आहे. जिल्हाबंदी पूर्ण असेलच असं नाही, अत्यावश्यक सेवेसाठी वाहतूक करता येईल पण विनाकरण बाहेर कोठे जाता येणार नाही. पोलीस याबाबत संपूर्ण विचारणा करतील, असंही टोपे यांनी सांगितलं.

Published by: Kiran Pharate
First published: April 21, 2021, 1:51 PM IST

ताज्या बातम्या