Home /News /nagpur /

दोस्तीत कुस्ती करणाऱ्या मित्राचा खेळ खल्लास; नागपूरात तरुणाची धारदार शस्त्रानं हत्या

दोस्तीत कुस्ती करणाऱ्या मित्राचा खेळ खल्लास; नागपूरात तरुणाची धारदार शस्त्रानं हत्या

दीपसिंग राजपूत असं हत्या झालेल्या 23 वर्षीय तरुणाचं नाव आहे.

दीपसिंग राजपूत असं हत्या झालेल्या 23 वर्षीय तरुणाचं नाव आहे.

Murder in Nagpur: ब्रेकअप झालेल्या गर्लफ्रेंडसोबत जवळीक वाढवल्याच्या (Love affair case) कारणातून एका 19 वर्षीय युवकानं 23 वर्षीय युवकाची धारदार शस्त्रानं वार (Attack with sharp Weapon) करून हत्या केली आहे.

नागपूर, 26 ऑगस्ट: मागील काही दिवसांपासून राज्याच्या उपराधानीत सुरू असलेलं हत्येचं सत्र थांबायचं नाही घेत नाहीये. नागपूरात दोन दिवसांपूर्वी एका 25 वर्षीय युवकाची दगडानं ठेचून हत्या केल्यानंतर आणखी एक अशीच घटना समोर आली आहे. मागील 48 तासांत झालेल्या दुहेरी हत्याकांडानं (Double murder in Nagpur) नागपूर हादरलं आहे. ब्रेकअप झालेल्या गर्लफ्रेंडसोबत जवळीक वाढवल्याच्या (Love affair case) कारणातून एका 19 वर्षीय युवकानं 23 वर्षीय युवकाची धारदार शस्त्रानं वार (Attack with sharp Weapon) करून हत्या केली आहे. या प्रकरणी नागपूरातील कपिलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे. दीपसिंग राजपूत असं हत्या झालेल्या 23 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तर सम्यम बागडे असं 19 वर्षीय आरोपी तरुणाचं नाव आहे. आरोपी सम्यक आणि मृत दीपसिंग दोघं चांगले मित्र होते. पण एका मुलीच्या कारणातून दोघांत खुन्नस निर्माण झाली होती. यातूनच 19 वर्षीय आरोपी सम्यकनं आपला मित्र दीपसिंग याची निर्घृण हत्या (Young man Killed friend) केली आहे. आरोपीनं मित्रावर धारदार शस्त्राने वार करत त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं आहे. हेही वाचा-बारावीतील विद्यार्थिनीवर मित्रांकडूनच गँगरेप ही घटना इतकी भयानक होती. या घटनेत दीपसिंग घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संबंधित घटना नागपूरच्या कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील क्वेटा कॉलनी परिसरात घडली आहे. 24 ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपीनं मित्रं दीपसिंगचा खेळ खल्लास केला आहे. हेही वाचा-नवऱ्यानंतर आईनंही घेतला जगाचा निरोप; हताश महिलेनं लेकीसह असा केला आयुष्याचा शेवट हत्येचं नेमकं कारण काय? खरंतर, 19 वर्षीय आरोपी सम्यक सध्या शिक्षण घेत आहे. मागील काही काळापासून त्याचं एका मुलीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. पण काही कारणांमुळे दोघांत दुरावा निर्माण झाला. यामुळे सम्यकच्या प्रेयसीनं त्याच्यासोबक ब्रेकअप केला. पण ब्रेकअप झाल्यानंतर मित्र दीपसिंगनं तिच्याशी जवळीक वाढवली. यातून सम्यकला दीपसिंगचा राग आला. यानंतर त्यानं आपल्या मित्राचा काटा काढला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कपिलनगर पोलीस करत आहेत. हेही वाचा-अन् फोटोतील तिघांनी सोडलं जग, एकटीच महिला उरली; साताऱ्यातील खळबळजनक घटना तर दुसऱ्या एका घटनेत एका 25 वर्षीय तरुणाची दगडावर डोकं आपटून हत्या करण्यात आली आहे. ही घटना नागपूर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजीवनगर परिसरात घडली आहे. सुरेंद्र पिंगर असं हत्या झालेल्या 25 वर्षीय तरुणाचं नाव असून जुन्या वादातून त्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर आरोपी तरुण फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
Published by:News18 Desk
First published:

Tags: Crime news, Murder, Nagpur

पुढील बातम्या