भोपाळ, 25 ऑगस्ट : मित्रांसोबत पिकनिकला (Picnic) गेलेल्या बारावीतील विद्यार्थीनीला (student) कोल्ड्रिंकमधून (Cold drink) नशेचं औषध देऊन तिच्यावर मित्रांनीच (friends) गँगरेप (gang rape) केल्याची घटना उघडकीला आली आहे. एक मैत्रिण आणि तीन मित्रांसोबत पिकनिक करून परत येताना ही घटना घडली.
मैत्रिणीने केला घात
ही घटना आहे मध्यप्रदेशमधल्या लसुडिया भागातील. पूजा नावाच्या मैत्रिणीच्या विनंतीवरून ही मुलगी पिकनिकला जायला तयार झाली. काही दिवसांपूर्वी तिची पूजाशी ओळख झाली होती. पूजाचा बॉयफ्रेंड आशिषही सोबत होता. शिवाय निपुल आणि रितेश हे मित्रही कारमध्ये होते. हे सर्वजण पिकनिकवरून परत येत असताना तिला मित्रांनी कोल्ड्रिंक प्यायला दिलं. त्यातील नशेच्या औषधामुळे ती बेशुद्ध झाली. त्यानंतर सर्वजण तिला आशिषच्या खोलीवर घेऊन गेले आणि तिथं तिघांनीही तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेतच तिला रस्त्यावर सोडून सर्वजण निघून गेले. शुद्धीत आल्यानंतर तिने आजूबाजूच्या नागरिकांना तिथला पत्ता विचारला आणि मित्रांना फोन करून घडलेली घटना सांगितली. त्यानी तरुणीच्या आईवडिलांना संपर्क साधला आणि मुलीला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पोलिसात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
हे वाचा -भयंकर! पैसे देण्यास नकार दिल्यामुळे पर्यटक तरुणीवर सामूहिक बलात्कार
तरुणीची जबानी
तरुणीनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तिला कोल्ड्रिंक प्यायल्यानंतर चक्कर आली. तिला पहिल्यांदा जाग आली तेव्हा ती एका बेडवर झोपलेली होती आणि आशिष तिच्यासोबत दृष्कृत्य करत होता. त्यानंतर ती पुन्हा बेशुद्ध झाली. दुसऱ्यांदा जाग आली तेव्हा निपुल दृष्कृत्य करत होता. त्यानंतर रितेशनेही तसेच केल्यानंतर तिला उचलून घराच्या बाहेर सोडून दिले. तिथे तिला पुन्हा चक्कर आली आणि रस्त्याच्या कडेलाच ती पडून राहिली. काही दिवसांपूर्वीच तिची पूजाशी ओळख झाली होती. तिचा बॉयफ्रेंड म्हणून आशिषची ओळख होती. तर इतर दोन मित्रांची केवळ नावे माहित होती. चारही आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.